स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया एफसी गोवाचा कॅप्टन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

एफसी गोवाने २०२०-२१ फुटबॉल मोसमासाठी संघातील अनुभवी स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याच्याकडे कर्णधारपद सोपविले आहे. गोमंतकीय मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज संघाचा मध्यरक्षक असेल.

पणजी  : एफसी गोवाने २०२०-२१ फुटबॉल मोसमासाठी संघातील अनुभवी स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याच्याकडे कर्णधारपद सोपविले आहे. गोमंतकीय मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज संघाचा मध्यरक्षक असेल.

एफसी गोवा संघ २०२०-२१ मोसमात इंडियन सुपर लीग (आयएसएल), तसेच प्रतिष्ठेच्या एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळेल. एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने मोसमासाठी चार सदस्यीय नेतृत्व चमू निवडला असून त्यात एदू व लेनी यांच्यासह सेरिटन फर्नांडिस व स्पॅनिश इव्हान गोन्झालेझ यांचा समावेश आहे. आयएसएल स्पर्धेला गोव्यातील तीन स्टेडियमवर बंद दरवाज्याआड जैवसुरक्षा वातावरणात येत्या २० नोव्हेंबरपासून सुरवात होत असून एफसी गोवाचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला फातोर्डा येथे बंगळूर एफसीविरुद्ध होईल.

एदू बेदिया ३१ वर्षांचा आहे. एदू २०१७-१८ पासून एफसी गोवाचा आधारस्तंभ असून २०२०-२१ हा त्याचा गोव्यातील संघातर्फे सलग चौथा मोसम असेल. या संघातर्फे सर्वाधिक मोसम खेळणारा तो पहिला परदेशी फुटबॉलपटू ठरेल. ३३ वर्षीय लेनी यंदा एफसी गोवाकडून तिसरा मोसम खेळत आहे.

‘‘संघ सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संघाचे कर्णधारपद हा माझा मोठा सन्मान आहे. एफसी गोवास मी नेहमीच माझे घर मानतो आणि येथील लोकांवर प्रेम करतो. या संघाचे शर्ट घालण्याचा आणि प्रतिनिधित्व करण्याचा मला फार मोठा अभिमान आहे. आता माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे, ती निभावण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ अशी प्रतिक्रिया बेदिया याने एफसी गोवा संकेतस्थळास 
दिली.

संबंधित बातम्या