Asian Champions League : एफसी गोवास संधी साधावी लागेल : बेदिया

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करताना बलाढ्य संघांविरुद्ध एफसी गोवास संधी साधण्यावर भर द्यावा लागेल, असे मत कर्णधार स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याने मंगळवारी व्यक्त केले. 

पणजी  : आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करताना बलाढ्य संघांविरुद्ध एफसी गोवास संधी साधण्यावर भर द्यावा लागेल, असे मत कर्णधार स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याने मंगळवारी व्यक्त केले. (Edu Bedia says FC Goa will have a chance in the Asian Champions League)

Goa Professional League : कळंगुटच्या विजयात सिद्धांतची छाप

एफसी गोवाने 2019-20 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड जिंकून आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेस थेट पात्र ठरलेला एफसी गोवा हा पहिला भारतीय क्लब ठरला आहे. स्पर्धेतील ई गट (पश्चिम विभागी) लढती 14 ते 30 एप्रिल या कालावधीत गोव्यात होणार असून एफसी गोवा होम मैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल. त्यांचा पहिला सामना कतारच्या अल रय्यान संघाविरुद्ध 14 एप्रिल रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. त्यानंतर 17 एप्रिल रोजी प्ले-ऑफ विजेत्या संघाविरुद्ध, तर 20 एप्रिल रोजी इराणच्या गतविजेत्या पर्सेपोलिस संघाविरुद्ध लढत होईल, त्यानंतर अनुक्रमे 23, 26 व 29 एप्रिल रोजी एफसी गोवा या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध परतीचे सामने खेळेल.

आशियाई चँपियन्स लीग मोहिमेविषयी बेदिया याने सांगितले, की "आयएसएल स्पर्धेतील प्रतिस्पर्धी समान ताकदीचे होते, आताच्या प्रतिस्पर्ध्यांच्या दर्जा पूर्णतः वेगळा आणि उच्च आहे. उदाहरणार्थ पर्सेपोलिस संघाने गतमोसमात स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. इतर प्रतिस्पर्धीही मातब्बर आहेत. आम्ही सरावात पूर्ण क्षमतेने तयारीवर भर दिला आहे. स्पर्धेतील सामने खेळताना आम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावाच लागेल."

एफसी गोवासमवेत 32 वर्षीय बेदिया याचा यंदा चौथा मोसम आहे. यापूर्वी तो स्पेनमधील नावाजलेल्या ला-लिगा स्पर्धेत चार वर्षे खेळला आहे. त्या स्पर्धेत बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याचा या स्पॅनिश मध्यरक्षकास अनुभव आहे. यंदाच्या आयएसएल स्पर्धेत एफसी गोवास चौथा क्रमांक मिळाला. अतिशय चुरशीच्या लढतीनंतर आता एफसी गोवा संघ नव्या आव्हानास सज्ज झाल्याचे बेदियाने नमूद केले. आयएसएलचे जैवसुरक्षा वातावरण संपवून एफसी गोवा संघाने नव्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे. या वातावरणासाठी खेळाडू मानसिकदृष्ट्या खंबीर असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

Goa professional league: गार्डियन एंजलच्या विजयात बेनेस्टॉनची हॅटट्रिक

आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेतील प्रतिस्पर्धी बलवान असले, तरी आम्हाला शैलीशी पूर्ण समरस होणे आवश्यक आहे. काही बदल गरजेचे असले तरीही आम्ही कणखरपणे खेळू आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर खडतर आव्हान उभे करण्याचा विश्वास बेदियाने व्यक्त केला.

संबंधित बातम्या