सुशिक्षित देशांनी भारताचे अनुकरण करु नये, शाहिद आफ्रिदीची आगपाखड

जर तुम्हाला मोठे चित्र पाहायचे असेल तर मला वाटते की आपण असा निर्णय घेण्याची गरज आहे जे जगाला दाखवेल की आपण एक देश आहोत आणि आपला स्वतःचा अभिमान आहे.
सुशिक्षित देशांनी भारताचे अनुकरण करु नये, शाहिद आफ्रिदीची आगपाखड
ECB आणि न्यूझीलंड बोर्डाचा हा निर्णय पाकिस्तानला (Pakistan) अजूनही पचवता आलेला नाही. आजी आणि माजी खेळाडूंनी या दोन्ही देशांविरुद्ध आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.Dainik Gomantak

गेले काही दिवस पाकिस्तान क्रिकेटसाठी (Pakistan Cricket) चांगले नाहीत. आधी न्यूझीलंड (New Zealand) आणि नंतर इंग्लंडने (England) पाकिस्तानचा दौरा (Tour of Pakistan) करण्यास नकार दिला. मात्र, दोन्ही संघांनी यासाठी वेगवेगळी कारणे दिली आहेत. न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तान दौरा ऐनवेळी रद्द केला. तर इंग्लंडने आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे कारण देत पाकिस्तान दौऱ्याला जाण्यास नकार दिला आहे. ईसीबी आणि न्यूझीलंड बोर्डाचा हा निर्णय पाकिस्तानला अजूनही पचवता आलेला नाही. आजी आणि माजी खेळाडूंनी या दोन्ही देशांविरुद्ध आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता पाकिस्तानचा माजी सलामीवीर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) देखील यावर टिका केली आहे.

ECB आणि न्यूझीलंड बोर्डाचा हा निर्णय पाकिस्तानला (Pakistan) अजूनही पचवता आलेला नाही. आजी आणि माजी खेळाडूंनी या दोन्ही देशांविरुद्ध आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.
सामन्याच्या काही तास आधी सुरक्षेच्या कारणावरुन न्यूझीलंडचा पाक दौरा स्थगित

आफ्रिदी म्हणाला, पीसीबी होम सीरीजला ग्रीन सिग्नल देण्यापूर्वी सुरक्षा तपासणीच्या अनेक फेऱ्या घेते. अशा स्थितीत न्यूझीलंड बोर्डाने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय आजिबात योग्य नाही. क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा कोणत्याही संघाच्या दौऱ्याचा प्रश्न येतो तेव्हा अनेक आघाड्यांवर तपास केला जातो. भेट देणाऱ्या राष्ट्राच्या सुरक्षा सदस्यांद्वारे योग्य तपासणी केली जाते. संघासाठी जाण्याचा मार्ग पूर्वनिश्चित केला जातो. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच, एखादा संघ त्या देशात खेळण्यासाठी येत असतो.

ECB आणि न्यूझीलंड बोर्डाचा हा निर्णय पाकिस्तानला (Pakistan) अजूनही पचवता आलेला नाही. आजी आणि माजी खेळाडूंनी या दोन्ही देशांविरुद्ध आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.
न्यूझीलंडनंतर आता इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह, PCBचे मोठे नुकसान

तो ई-मेल भारतातूनच : फवाद चौधरी

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी न्यूझीलंड संघाला भारताकडून धमकी देणारा ई-मेल आल्याचा दावा केला होता. त्यांने म्हटले होते की, न्यूझीलंड बोर्डाला भारतातून ईमेल गेला आहे. पण त्याचे लोकेशन व्हीपीएन द्वारे सिंगापूर दाखविण्यात आले आहे.

सुशिक्षित देशांनी भारताचे अनुकरण करु नये

पाकिस्तानी मंत्र्याच्या दाव्यावर आफ्रिदी म्हणाला, इतर 'सुशिक्षित राष्ट्रांनी' भारताच्या पावलावर पाऊल न टाकता त्यांनी त्यांच्या योग्यतेचा निर्णय घ्यावा. जर तुम्हाला मोठे चित्र पाहायचे असेल तर मला वाटते की आपण असा निर्णय घेण्याची गरज आहे जे जगाला दाखवेल की आपण एक देश आहोत आणि आपला स्वतःचा अभिमान आहे. एखादा देश आपल्या मागे असेल तर ठीक आहे, पण इतर देशांनी तीच चूक करावी असे मला वाटत नाही. ही सर्व सुशिक्षित राष्ट्रे आहेत आणि त्यांनी भारताचे अनुसरण करू नये. त्याऐवजी क्रिकेटने संबंध सुधारले पाहिजेत. भारतातील परिस्थितीही वाईट होती. आम्हाला धमक्या येत होत्या. आमच्या बोर्डाने आम्हाला निघायला सांगितले पण तरी आम्ही तिथे गेलो. कोरोनाच्या काळात इंग्लंडमध्ये जी परिस्थिती होती तरी देखील तेथे क्रिकेट चालू राहिले. असे त्याने स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com