गोव्यातील फुटबॉल सुधारण्यासाठी प्रयत्न

किशोर पेटकर
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

एफसी गोवा संघाचा राज्य फुटबॉल संघटनेला सविस्तर प्रस्ताव

पणजी

गोव्यातील फुटबॉल सुधारण्यासाठी एफसी गोवा प्रयत्नशील असून त्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात संघाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी गोवा फुटबॉल असोसिएशनला (जीएफए) सविस्तर प्रस्ताव सादर केला.

गोव्यातील फुटबॉल सुधारणेसंदर्भात टंडन यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. गोव्यातील युवक यशस्वी होण्याकरीता फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठीतसेच गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहेअसे टंडन यांना वाटते. गोवा प्रो-लीग ही सर्वोत्तम देशांतर्गत फुटबॉल लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेतून कितीतरी नवोदित उदयास आल्याची उदाहरणे टंडन यांनी दिली आहेत. काही खेळाडूंनी आयएसएल स्पर्धेत खेळण्यापर्यंत मजल मारली आहेपण हे पुरेसे नाहीअसे त्यांना वाटते.

नवे मॉडेल आवश्यक

प्रो-लीग स्पर्धेच्या सध्याच्या ढाच्यात बदल करून स्पर्धा जास्त स्पर्धात्मक आणि अधिक आकर्षित करणे आवश्यक असल्याचे मत टंडन यांनी मांडले आहे. स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वांसाठी महसूल मिळवून देईल आणि चांगले उत्पादनतसेच वाढ यासंदर्भात विकास साधेल असे नवे मॉडेल आवश्यक आहेअसे टंडन यांनी नमूद केलेय. महसूल मुख्य गटातील क्लबमध्ये वितरित करण्याची सूचना त्यांनी प्रस्तावात केली आहे.

जीएफएला प्रस्ताव सादर

गोव्यातील फुटबॉल सुधारणाविषयी प्रस्ताव एफसी गोवाने गेल्या आठवड्यात जीएफएला सादर केला. सध्याचा ढाचा सुधारणा हाच या प्रस्तावाचा मुख्य गाभा आहे. त्यानुसार खेळाडूंच्या विकासास मदत होईलत्यांना सामना अनुभव प्राप्त होईल आणि गोमंतकीय फुटबॉलला नफा होईल हेच उद्दिष्ट असल्याचे टंडन यांनी स्पष्ट केले. खालच्या श्रेणीतील संघही बळकटअसे टंडन यांना वाटते. थेट प्रक्षेपण आणि सोशल मीडियाचा आधार या बाबींचाही प्रस्तावात समावेश आहे.

 बाहेरगावचे संघ हवेत

गोव्यातील फुटबॉल जास्त स्पर्धात्मक करण्याच्या हेतूने गोवा प्रो-लीग स्पर्धेत बाहेरगावचे संघ खेळविण्याची सूचना एफसी गोवाने प्रस्तावात केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय गुणवत्तेविरुद्ध खेळताना गोव्यातील खेळाडूंना कौशल्याची चाचपणी करण्याची संधी मिळेल. बाहेरगावचे तीन किंवा जास्त संघ खेळविता येतीलअसे प्रस्तावात नमूद केले आहे. आयएसएल आणि आय-लीग क्लब आपले राखीव संघ खेळविण्याबाबत अनुकूल असल्याची माहिती टंडन यांनी दिली आहे. बाहेरगावच्या संघांकडून प्रवेश शुल्क आकारण्याची सूचना प्रस्तावात आहे.

संपादन - अवित बगळे

 

संबंधित बातम्या