१८ वर्षीय मेघनने सायकलिंगमध्ये केली कमाल; गाठला २०० किमीचा टप्पा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

पणजी-पर्वरी-थिवी-होंडा-उसगाव-मोले-केपे-मडगाव-जुने गोवे-पणजी या मार्गावर झालेल्या २०० किलोमीटर सायकल मोहीम ५२ सायकलपटूंनी निर्धारित साडेतेरा तासांत पूर्ण करण्याची कामगिरी फत्ते केली. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मेघन हिने हे अंतर पावणेबारा तासांत पार केले.

पणजी-  ट्रायगोवा फौंडेशनच्या २०० किलोमीटर सायकलिंग मोहिमेत १८ वर्षीय मेघन फर्नांडिस हिने कमाल केली. एकूण ५२ यशस्वी सायकलपटूंत महिलांमध्ये साळगावची मेघन सर्वांत युवा ठरली.

पणजी-पर्वरी-थिवी-होंडा-उसगाव-मोले-केपे-मडगाव-जुने गोवे-पणजी या मार्गावर झालेल्या २०० किलोमीटर सायकल मोहीम ५२ सायकलपटूंनी निर्धारित साडेतेरा तासांत पूर्ण करण्याची कामगिरी फत्ते केली. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मेघन हिने हे अंतर पावणेबारा तासांत पार केले. मोहिमेत २९ सायकलपटूंनी प्रथमच भाग घेतला होता.

‘माझी ही २०० किलोमीटर अंतराची पहिलीच सायकल मोहीम ठरली. खरं म्हणजे, मी निराश होते. सायकल प्रवास १०० किलोमीटरनंतर खरोखरच खडतर होता, मोहीम पूर्ण केल्याने आनंदित आहे,’’ असे मेघन हिने यशस्वीपणे निर्धारित अंतर पूर्ण केल्यानंतर सांगितले. वेळ्ळी येथील प्रिन्स कुलासो याने २०० किलोमीटर ८ तास २९ मिनिटांत पूर्ण केले. गोविंद प्रभू मोनी याने सुपर रँडोनॉर मालिकेतील २००, ३००, ४०० व ६०० किलोमीटर सायकल मोहीम एका कॅलेंडर वर्षात पूर्ण करण्याचा मान मिळविला. 

संबंधित बातम्या