"इरफान पठाणचे आपल्या सुनेसोबत अनैतिक संबंध"; वृद्ध दाम्पत्याचे आरोप

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

माजी क्रिकेटपटू  इरफान पठाणवर अहमदाबादच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत.

माजी क्रिकेटपटू (Cricketer) इरफान पठाणवर (Irfan Pathan) अहमदाबादच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सूनेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप (Allegations) इरफान पाठानवर आला आहे. सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या या प्रकरणाविषयी  तक्रारदाराच्या कुटूंबाने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. वृद्ध दांपत्याचा आरोप आहे की, इरफान आपल्या मुलाला मारहाण करीत आहे आणि त्याच्या ओळखीचा गैरवापर करीत आहे. सय्यद इब्राहिम आणि त्यांच्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात येऊन आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. (The elderly couple alleged that former cricketer Irfan Pathan had an affair with his daughter-in-law)

इब्राहिम यांच्या सुनेने 11 मार्च 2021 रोजी आपल्या संपूर्ण कुटुंबा विरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप करत तक्रार केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर इब्राहिम यांच्या संगण्यानुसार त्यांना खोट्या आरोपाखाली फसवण्यात येत असून, आपल्या सुनेचे बऱ्याच दिवसांपासून इरफान खान सोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप इब्राहिम यांनी केला आहे. इब्राहिम यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार इरफान खान आणि त्यांच्या पत्नीमध्ये लग्नाच्या आधीपासून संबंध होते. तर आपली पत्नी ही इरफान खानची चुलत बहिण असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

ICC च्या कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतने रचला इतिहास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेने हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल केल्यावर प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी इब्राहिम आणि त्याचे कुटुंबीय मुलीच्या चारित्र्यावर आक्षेप घेत आहेत. मात्र, अद्याप इरफान पठाणकडून यासंदर्भात कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या वृद्ध दांपत्याने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन व्हिडिओ बनवून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या