गोव्यातील फुटबॉलपटूंना रोजगाराची संधी

यासंदर्भात 19 जुलैपासून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) (Goa Football Association) पणजीतील मुख्य कार्यालयातून किंवा जीएफए नोंदणीकृत क्लब अथवा कार्यकारी समिती सदस्यांकडून माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
गोव्यातील फुटबॉलपटूंना रोजगाराची संधी
मुंबईतील आयकर प्रधान मुख्य आयुक्तांच्या कार्यालयातर्फे फुटबॉलसह (Football) 22 क्रीडाप्रकारातील गुणवान क्रीडापटूंना नोकरीत (Jobs for athletes) घेतले जाणार आहे. Dainik Gomantak

पणजी: मुंबईतील आयकर प्रधान मुख्य (Chief of Income Tax) आयुक्तांच्या कार्यालयातर्फे फुटबॉलसह (Football) 22 क्रीडाप्रकारातील गुणवान क्रीडापटूंना नोकरीत (Jobs for athletes) घेतले जाणार आहे. यामध्ये आयकर निरीक्षक (Income tax inspector) (किमान शैक्षणिक पात्रता - पदवी), कर सहाय्यक (पदवी) आणि बहुकार्य कर्मचारी (दहावी) या पदांचा समावेश आहे.

राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेला, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत, राज्य शालेय संघातर्फे राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेला खेळाडू, तसेच राष्ट्रीय शारीरिक कार्यक्षमता मोहिमेअंतर्गत शारीरिक कार्यक्षमता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त क्रीडापटू या पदासाठी अर्ज करू शकतो. यासंदर्भात सविस्तर माहिती www.incometaxmumbai.com अथवा https://www.incometaxmumbai.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतील.

वरील पदांसाठी गोव्यातील फुटबॉलपटू अर्ज करू शकतात. यासंदर्भात 19 जुलैपासून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) पणजीतील मुख्य कार्यालयातून किंवा जीएफए नोंदणीकृत क्लब अथवा कार्यकारी समिती सदस्यांकडून माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com