ENG vs IND: पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर माजी खेळाडूंच्या संतप्त प्रतिक्रिया

सर्वांच्या चाचण्या जरी निगेटीव्ह आल्या असल्या तरी कोरोनाचा (Corona) वाढता धोका लक्षात घेता, भारत इंग्लंड (England) यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. पण या निर्णयामुळे अनेक माजी अनुभवी खेळाडू संतप्त झाले आहेत.
ENG vs IND: पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर माजी खेळाडूंच्या संतप्त प्रतिक्रिया
5 वी कसोटी रद्द झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) भडकला असून, त्याने टीम इंडियावर टिकास्त्र सोडले आहे. Dainik Gomantak

ENG vs IND: भारत (India) विरुध्द इंग्लंड (England) यांच्यातील 5 वी कसोटी रद्द झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) भडकला असून, त्याने टीम इंडियावर टिकास्त्र सोडले आहे. कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे पाहता, सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 10 सप्टेंबरपासून खेळला जाणार होता. विराट कोहलीचा (Virat Kohli) संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता असे मानले जात आहे की पुढील वर्षी पाचवी कसोटी खेळली जाईल.

5 वी कसोटी रद्द झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) भडकला असून, त्याने टीम इंडियावर टिकास्त्र सोडले आहे.
Eng Vs Ind: भारतीय क्रिकेटपटूंची टेस्ट निगेटिव्ह

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारताने शेवटचा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. तसेच भारतीय संघातील सपोर्ट स्फटसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल भारतीय संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सर्वांच्या चाचण्या जरी निगेटीव्ह आल्या असल्या तरी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, भारत इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. पण या निर्णयामुळे अनेक माजी अनुभवी खेळाडू संतप्त झाले आहेत.

सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करताना म्हणाले, टीम इंडियाच्या सामना रद्द करण्याच्या निर्णयामुळे इंग्लंड क्रिकेटचा अपमान झाला आहे.

वसिम जाफर
वसिम जाफर दैनिक गोमन्तक

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com