ENG vs IND: विराट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांची पुन्हा हुल्लडबाजी

विराट कोहली 7 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी (England fans) त्याच्यासोबत अतिशय लाजिरवाणे कृत्य केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (The video went viral on social media) होत आहे.
ENG vs IND: विराट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांची पुन्हा हुल्लडबाजी
विराट 7 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी त्याच्यासोबत अतिशय लाजिरवाणे कृत्य केले.Dainik Gomantak

विराट कोहली (Virat Kohli) सोबत इंग्लंडच्या चाहत्यांनी (England fans) पुन्हा एकदा लज्जास्पद कृत्य केले आहे. याचा व्हिडिओ (Video) देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल (viral on social media) होत आहे. भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यात तिसरा कसोटी सामना हेडिंगले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. भारताचा पहिल्या डावात अवघ्या 78 धावांवर संपुष्टात आला. भारताचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला आहे. विराट 7 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी त्याच्यासोबत अतिशय लाजिरवाणे कृत्य केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 विराट 7 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी त्याच्यासोबत अतिशय लाजिरवाणे कृत्य केले.
ENG vs IND: विराटच्या आक्रमक अंदाजावरुन गावसकर आणि हुसेन यांच्यात तू..तू..मैं..मैं..

जेव्हा कोहलीला इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने बाद केले. त्यानंतर कोहली मान खाली घालून पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना, इंग्लंड संघाच्या समर्थकांनी बार्मी-आर्मीने भारतीय कर्णधारची छेड काढली. त्यांनी कोहलीला चेरिओ विराट म्हणत हातांनी पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 विराट 7 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी त्याच्यासोबत अतिशय लाजिरवाणे कृत्य केले.
ENG vs IND: हेडिंग्लेतील-लीड्स मैदान भारतासाठी 'लकी'

कर्णधार कोहलीने आठव्या षटकात रॉबिन्सनला त्याचा पहिला चौकार मारला, परंतु अँडरसनने त्याला बटलरच्या करवी झेलबाद करत भारताला धक्का दिला. विराट बाद झाला त्यावेळी 11 षटकात भारताच्या 3 बाद 20 पर्यंत धावा झाल्या होत्या.

तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव केवळ 78 धावांत गडगडला, भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर रहाणेने 18 धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून क्रेग ओव्हरटन आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी तीन बळी घेतले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com