Eng Vs Ind: रोहित - पुजाराने भारताचा डाव सावरला

रोहित शर्माची शतकी खेळी (Eng Vs Ind)
Eng Vs Ind: रोहित - पुजाराने भारताचा डाव सावरला
Rohit Sharma with Cheteshwar Pujara at Oval Cricket Ground (Eng Vs Ind)Tweeter / @ICC

Eng Vs Ind: इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील ओव्हल (Oval Cricket Ground) येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या समाप्तीनंतर भारताने बिनबाद 43 अशी सुरुवात केली होती. आज सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताच्या सलामीवीरांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला, परंतु वैयक्तिक 46 धावांवर असताना के एल राहुल अँडरसनच्या गोलंदाजीवर बेअरस्टोकडे झेल देऊन बाद झाला.

Rohit Sharma with Cheteshwar Pujara at Oval Cricket Ground (Eng Vs Ind)
सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने WWE Wrestler भावनिक

त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने रोहित शर्मा (C. Pujara made Partnership with Rohit Sharma) समवेत भारतीय संघासाठी उपयुक्त अशी भागीदारी केली. दोन्ही खेळाडूंचा मैदानावर जम बसला. सावध पवित्र्याने धावा बनवण्यात दोन्ही भारतीय फलंदाज यशस्वी ठरले. धावफलकावर 236 धावा लागले असताना रोहित शर्मा १२७ (Rohit Sharma Century) धावांवर रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर क्रिस वोक्सकडे झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ धावसंख्येत एका धावेची भर टाकून चेतेश्वर पुजारा (C. Pujara) देखील 61 धावा बनवून रोबिन्सनच्या गोलंदाजीवर मोइन अलीकडे झेल देऊन तंबूत परतला.

Rohit Sharma with Cheteshwar Pujara at Oval Cricket Ground (Eng Vs Ind)
ENG vs IND: टीम इंडिया चौथी कसोटी जिंकेल, व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भविष्यवाणी

त्यांनतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने रवींद्र जडेजाच्या साथीने धावफलक हलता ठेवला. परंतु अंधूक प्रकाशामुळे पंचानी सामना वेळे अगोदरच थांबवला तेव्हा भारताच्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा झाल्या होत्या. विराट कोहली 22 (Captain Virat Kohli) धावा तर रवींद्र जडेजा 9 धावांवर नाबाद आहेत. व भारताला 171 धावांची उपयुक्त अशी आघाडी मिळाली आहे.

(संक्षिप्त धावफलक: भारत प. डाव सर्वबाद १९१ धावा, इंग्लंड प. डाव सर्वंबाद २९० धावा, भारत दु. डाव ३ बाद २७० धावा, भारत १७१ धावांनी आघाडीवर)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com