END vs IND: 'अजिंक्य राहणेला विश्रांती देण्याची वेळ आली आहे';व्हीव्हीएस लक्ष्मण

मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. अशा परिस्थितीत विराट कोहली (Virat Kohli) आणि व्यवस्थापन सूर्यकुमारला पदार्पण करण्याची संधी देऊ शकतात अशी शक्यता आहे.
END vs IND: 'अजिंक्य राहणेला विश्रांती देण्याची वेळ आली आहे';व्हीव्हीएस लक्ष्मण
भारताचे (India) माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मबद्दल मोठे विधान केले आहे.Dainik Gomantak

END vs IND: भारताचे (India) माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मबद्दल मोठे विधान केले आहे. इंग्लंडमध्ये (England) फलंदाजीत वारंवार अपयश येत असल्याने भारताच्या उपकर्णधाराला आता विश्रांती दिली पाहिजे.

लक्ष्मणने एका मध्यमाला बोलताना सांगितले, रहाणेला विश्रांती देण्याची वेळ आली आहे. मला खात्री नाही की त्याच्यासाठी भविष्य काय आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. माझा नेहमीच विश्वास आहो की दर्जेदार खेळाडू संघात परत येतात. पण, त्याने दाखवलेला फॉर्म आणि आत्मविश्वास त्याची देहबोली त्याच्या खेळीतून सध्या दिसत नाही.

भारताचे (India) माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मबद्दल मोठे विधान केले आहे.
ENG vs IND: संघात स्थान टिकविण्यासाठी ही माझी शेवटची संधी होती; रोहितचा मोठा खुलासा

वास्तविक, अजिंक्य रहाणेची बॅट या संपूर्ण वर्षात चालली नाही. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत रहाणेला विशेष कामगिरी करता आलेली नाही. असे असूनही, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर अविरत विश्वास ठेवला आहे. रहाणेने जानेवारी 2021 पासून 11 कसोटी सामने खेळले असून त्याने फक्त 19.57 च्या सरासरीने 372 धावा केल्या आहेत.

या वर्षी रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 2 अर्धशतके केली आहेत. ही दोन्ही अर्धशतके इंग्लंडविरुद्ध आली आहेत. रहाणेने फेब्रुवारीमध्ये खेळलेल्या चेन्नई मधील कसोटी सामन्यात 67 धावा केल्या. त्यानंतर रहाणेने साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 49 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत त्याने 61 धावा केल्या. या खेळींव्यतिरिक्त रहाणेला या वर्षी मोठी खेळी करता आलेली नाही.

भारताचे (India) माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मबद्दल मोठे विधान केले आहे.
END vs IND: चौथ्या कसोटीला आजपासून सुरुवात, असे असेल ओव्हलमध्ये हवामान

रहाणेची निराशाजनक कामगिरी

अजिंक्य रहाणेची फलंदाजीची सरासरी 2015च्या दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यानंतर प्रथमच 40 च्या खाली गेली आहे. हा खराब फॉर्म आता 57 कसोटीनंतर अद्याप सुरु आहे. रहाणेने शेवटच्या 15 कसोटी डावात 19 च्या सरासरीने फक्त 285 धावा केल्या आहेत. त्याने फक्त तीन वेळा 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

दरम्यान, ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत-इंग्लंड यांच्यातील अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनापुढे त्याच्या निवडीबाबतचा एक मोठा प्रश्न आहे. सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणात संधी देण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. त्यामुळे संघाच्या उपकर्णधार वगळण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापन घेते का हे पाहण्यासारखे असेल. त्याचबरोबर मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि व्यवस्थापन सूर्यकुमारला पदार्पण करण्याची संधी देऊ शकतात अशी शक्यता आहे. सूर्याने 3 एकदिवसीय सामन्यात 62 च्या सरासरीने 124 धावा केल्या आहेत, तर 4 टी -20 मध्ये 46.33 च्या सरासरीने त्याने 139 धावा केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com