ENG vs IND: पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोचा नवा प्लान तयार
या मालिकेतील भारतीय क्रिकेटचा एक चाहता असलेला जार्वो (Jarvo) सामन्यावेळी मैदानात आलेला आपण पाहिला असेलच.Dainik Gomantak

ENG vs IND: पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोचा नवा प्लान तयार

पाचव्या कसोटी (Fifth Test) दरम्यान जार्वो पुन्हा मैदानात येणार का, आल्यास तो मैदानावर काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

ENG vs IND: भारत (India) विरुध्द इंग्लंड (England) यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याला (Test matches) शुक्रवार 10 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत पहिल्या चार सामन्यात टीम इंडियाने (Team India) जबरदस्त प्रदर्शन करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील भारतीय क्रिकेटचा एक चाहता असलेला जार्वो (Jarvo) सामन्यावेळी मैदानात आलेला आपण पाहिला असेलच.

या मालिकेतील भारतीय क्रिकेटचा एक चाहता असलेला जार्वो (Jarvo) सामन्यावेळी मैदानात आलेला आपण पाहिला असेलच.
ENG vs IND: सौरव गांगुलीच्या 'त्या' विधानावर मायकेल वॉनचे प्रतिउत्तर

आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात तो कधी फलंदाज, कधी गोलंदाज तर कधी क्षेत्ररक्षक बनून भर सामन्याच्यावेळी मैदानात येतो. त्यामुळे जार्वोला इंग्लंड पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. परंतु तो आता सुटला असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पोस्टला जार्वोने देखील पुष्टी दिली आहे. त्याने 5 सप्टेंबरला एक ट्विट करत लिहिले आहे की, मी आता स्वतंत्र आहे. आता पुढे काय करु? सध्या तरी हे ट्विटर अकाउंट जार्वोचेच असल्याचे बोलले जात आहे.

या मालिकेतील भारतीय क्रिकेटचा एक चाहता असलेला जार्वो (Jarvo) सामन्यावेळी मैदानात आलेला आपण पाहिला असेलच.
END vs IND: 'अजिंक्य राहणेला विश्रांती देण्याची वेळ आली आहे';व्हीव्हीएस लक्ष्मण

ओव्हल कसोटीत इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना जार्वो अचानक मैदानात आला त्यावेळी तो चेंडू टाकण्याच्या तयारीत होता. 69 क्रमांकाची जर्सी घालून त्याने मैदानात प्रवेश केला. आतापर्यंतच्या सामन्यात त्याने मैदानात प्रवेश केल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेकांनी म्हणले होते. कारण यामुळे खेळाडूंची सुरक्षा देखील धोक्यात येऊ शकते. यावरुन इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आता पाचव्या कसोटी दरम्यान जार्वो पुन्हा मैदानात येणार का, आल्यास तो मैदानावर काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com