ENG vs IND: सौरव गांगुलीच्या 'त्या' विधानावर मायकेल वॉनचे प्रतिउत्तर

भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ (The best team) आहे की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. आणि त्याची सुरुवात बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली.
ENG vs IND: सौरव गांगुलीच्या 'त्या' विधानावर मायकेल वॉनचे प्रतिउत्तर
सौरव गांगुली आणि शेन वॉर्नने चौथ्या कसोटी सामन्यानंतर एक ट्विट केले. त्यात भारताला सर्वोत्तम संघ म्हणून उल्लेख केला. Dainik Gomantak

ENG vs IND: मायकेल वॉनने (Michael Vaughan) सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) भारताला (India) सर्वोत्तम संघ म्हणण्याऱ्या विधानावर आता प्रतिउत्तर दिले आहे. पहिल्या डावात केवळ 191 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाने (Indian Team) सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि सामना जिंकला. पण आता भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ (The best team) आहे की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. आणि त्याची सुरुवात बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली.

सौरव गांगुली आणि शेन वॉर्नने चौथ्या कसोटी सामन्यानंतर एक ट्विट केले. त्यात भारताला सर्वोत्तम संघ म्हणून उल्लेख केला.
ENG vs IND: रवी शास्त्री, विराट कोहली यांनी बायो-बबल तोडल्याने BCCI नाराज

सौरव गांगुली आणि शेन वॉर्नने चौथ्या कसोटी सामन्यानंतर एक ट्विट केले. त्यात भारताला सर्वोत्तम संघ म्हणून उल्लेख केला. मात्र, इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉन यावर याने यावर प्रतिउत्तर देत म्हणाला की, भारत सर्व फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम संघ नाही.

सौरव गांगुलीने ट्वीट करून लिहिले, "छान सामना. कौशल्याने सामन्यात फरक पडला. तथापि, सर्वात मोठा फरक दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळला आहे. भारतीय क्रिकेट इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. वॉन गांगुलीच्या या ट्विटला पुन्हा ट्विट करत म्हणाला, "भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. पण पांढऱ्या चेंडूवर नाही.

सौरव गांगुली आणि शेन वॉर्नने चौथ्या कसोटी सामन्यानंतर एक ट्विट केले. त्यात भारताला सर्वोत्तम संघ म्हणून उल्लेख केला.
Eng Vs Ind: भारत कसोटी मालिकेत 2 - 1 ने आघाडीवर

सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेल्या आणि अनेकदा भारतीय चाहत्यांशी विनोद करणाऱ्या वॉनने पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये नाही तर टेस्ट क्रिकेटमध्ये असे म्हणत गांगुलीला दुरुस्त केले.

भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी अतुलनीय आघाडी घेतली आहे. भारताने चौथ्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडवर 157 धावांनी विजय मिळवला. यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची अक्षर: दाणादाण उडविली. यात उमेश यादव (60 धावांत 3), बुमराह (27 धावांत 2), शार्दुल ठाकूर (22 धावांत 2) आणि रवींद्र जडेजा (50 धावांत 2) गडी बाद केले. 368 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 92.2 षटकांत 210 धावांवर संपुष्टात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com