ENG vs IND: रोहित शर्माबाबत सचिन तेंडुलकरचे मोठे विधान

रोहित (Rohit) बाहेर जाणारा चेंडू सोडत आहे. तो नेहमीच एक महान खेळाडू होता. पण इंग्लंडमधील त्याची आतापर्यंतची खेळी पाहून मी असे म्हणू शकतो की त्याने त्याची फलंदाजी निश्चितच उंचावलेली आहे.
माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे.
माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे.Dainik Gomantak

टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या सलामीवीरांनी अप्रतिम कामगिरी केली. लॉर्ड्सच्या मैदानावर केएल राहुलने शानदार शतक झळकावले, तर दुसरीकडे रोहित शर्माने 83 धावांची दमदार खेळी खेळली. आता माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे.

माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे.
Eng Vs Ind: माजी क्रिकेटपटू जेफ्री बॅायकॅाटने उपस्थित केले रुटच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

सचिन पीटीआयला म्हणाला, रोहित इंग्लंडमध्ये कसा खेळतोय ते बघत आहे. "मी जे काही पाहिले ते मला वाटते की त्याने आता त्याच्या फलंदाजीत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने आपली दुसरी बाजू दाखवली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने हे दाखविले आहे की, तो गरजेनुसार आपला खेळ बदलू शकतो. त्याने सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळायला सुरुवात केली आहे. "

माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे.
ENG vs IND: विराट,रोहित यांच्यात वाद आहेत, असे बोलणाऱ्यांनी एकदा हा व्हिडिओ पहाच...

तेंडुलकर पुढे म्हणाला, “रोहित एका लिडर सारखा मैदानात उभा राहत आहे आणि त्याला केएल राहुलची तेवढीच चांगली साथ मिळत आहे. राहिला प्रश्न पुल शॉट खेळण्याचा तर त्याने त्या शॉटने अनेक वेळा चेंडू सीमेवर मारला आहे. दोन्ही कसोटीत त्याने संघासाठी काय साध्य केले याकडे मी पहात आहे. रोहित बाहेर जाणारा चेंडू सोडत आहे. तो नेहमीच एक महान खेळाडू होता. पण इंग्लंडमधील त्याची आतापर्यंतची खेळी पाहून मी असे म्हणू शकतो की त्याने त्याची फलंदाजी निश्चितच उंचावलेली आहे.

इंग्लंडच्या फलंदाजीबाबत सचिन म्हणाला की, मला असे वाटत नाही की जो रूट हा वन मॅन आर्मी प्रमाणे खेळत आहे. तो वगळता कोणीही या इंग्लिश फलंदाजी क्रमवारीत मोठे शतक झळकावू शकेल असे सध्या तरी दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com