ENG vs IND: टीम इंडिया चौथी कसोटी जिंकेल, व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भविष्यवाणी

भारतीय फलंदाज तिसऱ्या दिवशी दिवसभर फलंदाजी करुन इंग्लंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील.
टीम इंडिया (Team India) चौथी कसोटी जिंकेल अशी भविष्यवाणी भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केली आहे.
टीम इंडिया (Team India) चौथी कसोटी जिंकेल अशी भविष्यवाणी भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केली आहे. Dainik Gomantak

ENG vs IND: टीम इंडिया (Team India) चौथी कसोटी जिंकेल अशी भविष्यवाणी भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केली आहे. चौथ्या कसोटीच सध्याची परिस्थिती पाहता भारत ओव्हलचा सामना जिंकेल. ओव्हलची (Oval) विकेट ही इंग्लंडमधील (England) सपाट विकेट असल्याने तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज नक्कीच चांगली कामगिरी करतील. असे लक्ष्मण यांनी स्पष्ट केले. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोघे सध्या क्रीजवर आहेत. संघाची धावसंख्या 43/0 आहे. भारत अजूनही 56 धावांनी मागे आहे.

टीम इंडिया (Team India) चौथी कसोटी जिंकेल अशी भविष्यवाणी भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केली आहे.
Eng Vs Ind: चौथ्या कसोटीत इंग्लंड संघाची आघाडी

लक्ष्मण म्हणाले, “भारत या परिस्थितीतून ओव्हल कसोटी जिंकेल. तिसऱ्या दिवशीची विकेट ही फलंदाजीसाठी अनुकूल आहे. आणि भारतीय फलंदाज जागतिक दर्जाचे आहेत, ते यावर नक्कीच चांगली कामगिरी करतील. "केवळ लक्ष्मणच नाही, इंग्लंडचा नंबर 3 चा माजी फलंदाज इयान बेलनेही चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसासाठी असाच अंदाज वर्तवला आहे. बेलच्या मते, भारतीय फलंदाज तिसऱ्या दिवशी दिवसभर फलंदाजी करुन इंग्लंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील.

टीम इंडिया (Team India) चौथी कसोटी जिंकेल अशी भविष्यवाणी भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केली आहे.
ENG vs IND: रक्ताने जखमी तरीही तो मैदानावर,जेम्स अँडरसनची अनोखी खेळाडू वृत्ती

बेल म्हणाले, "फलंदाजीस ही विकट चांगली आहे." मी अंदाज लावत आहे की इंग्लंडवर दबाव आणण्यासाठी भारतीय फलंदाज उद्या दिवसभर फलंदाजी करतील. "रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या डावात भारताला भक्कम सुरुवात करून दिली आहे. या मालिकेत शतक ठोकणारा राहुल 22 धावांवर खेळत असून, रोहित 20 धावांवर आहे, असे त्यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, भारताच्या 191 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिल्या डावात 290 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडला 99 धावांची आघाडी मिळाली आहे. सकाळच्या सत्रात, इंग्लिश संघ 62/5 वर संघर्ष करत असताना तळातील फलंदाजांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत नेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com