Eng Vs Ind: भारतीय क्रिकेटपटूंची टेस्ट निगेटिव्ह

पाचवी कसोटी होण्यामागचे सर्व अडथळे दूर (Eng Vs Ind)
Eng Vs Ind: भारतीय क्रिकेटपटूंची टेस्ट निगेटिव्ह
Indian Cricket Team (Eng Vs Ind)Dainik Gomantak

Eng Vs Ind: सर्व खेळाडूंच्या आरटी-पीसीआर चाचणी (RTPCR Test) निगेटिव्ह आल्यामुळे भारतीय क्रिकेट संघावरील (Indian Cricket Team) करोनाचे संकट मिटले आहे. त्यामुळे आता पाचवा कसोटी सामना (5th Test Match Eng Vs Ind) ठरल्याप्रमाणे खेळवला जाईल.

भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य, सहाय्यक फिजिओ गौतम परमार यांची टेस्ट पॉझिटिव्ह (Assistant Physio Gautam Parmar Corona Positive) आल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चाना उधाण आले होते. सामन्या भोवती करोनाचे सावट पसरू लागले होते, त्यामुळे भारताचे सराव सत्रही (Indian Team Practice Session) थांबवण्यात आले होते, सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबवून त्यांच्या आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आल्या होत्या.

Indian Cricket Team (Eng Vs Ind)
ENG vs IND: टीम इंडियातील आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण

दरम्यान भारताने पाचवा सामना ना खेळता, इंग्लंडला पुढे जाण्यास द्यावे, अशी मागणीही ईसीबीने केल्याचे वृत्त आले होते. ज्याचा बीसीसीआयने विरोध केला. त्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीसह संघातील सिनिअर खेळाडूंची मते बीसीसीआयने जाणून घेतली, आणि त्यानंतर ईसीबीला स्पष्ट शब्दात 'नाही' असे ठाम उत्तर दिले. सर्वकाही खेळाडूंच्या चाचणी अहवालावर अवलंबून राहिले होते.

रात्री उशिरा खेळाडूंच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आणि सामन्यातील अडचणी दूर झाल्या. त्यामुळे आता दोन्ही क्रिकेट मंडळे एकत्र बसून लवकरच निर्णय घेतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com