Moeen Ali Comes Out of Retirement: ऑलराऊंडर मोईन अलीची रिटायरमेंटमधून माघार! 'या' मोठ्या मालिकेसाठी इंग्लंड टीममध्ये निवड

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीतून माघार घेतली आहे.
Joe Root and Moeen Ali
Joe Root and Moeen AliDainik Gomantak

England all-rounder Moeen Ali has come out of retirement: इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता तो पुन्हा इंग्लंड कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे.

मोईन अलीची निवड 16 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड संघात करण्यात आली आहे. त्याला दुखापतग्रस्त जॅक लीच ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे.

Joe Root and Moeen Ali
Engalnd Team for Ashes: WTC Final नंतर होणाऱ्या ऍशेसच्या पहिल्या दोन मॅचसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 खेळाडूंना संधी

मोईनने 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण लीच ऍशेस मालिकेतून बाहेर झाल्यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम, इंग्लंड पुरुष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी मोईनशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्याने कसोटी निवृत्तीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

मोईन अलीने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 64 कसोटी सामने खेळले असून 195 विकेट्स घेतल्या आहेत आणि 2914 धावा केल्या आहेत.

Joe Root and Moeen Ali
IND vs AUS: भारी योगायोग! फक्त रोहितच नाही, तर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचीही WTC Final मध्ये 'स्पेशल फिफ्टी'

ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी इंग्लंड संघ -

  • बेन स्टोक्स (कर्णधार), ऑली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जो रुट, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रुक, मोईन अली, बेन डकेट, झॅक क्रावली, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, डॅन लॉरेन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड, जोश टंग.

ऍशेस मालिका 2023 (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  • 16 - 20 जून - पहिली कसोटी - एजबस्टन

  • 28 जून - 2 जुलै - दुसरी कसोटी - लॉर्ड्स

  • 6 - 10 जुलै - तिसरी कसोटी - हेडिंग्ले

  • 19 - 23 जुलै - चौथी कसोटी - ओल्ड ट्रॅफोर्ड

  • 27 - 31 जुलै - पाचवी कसोटी - द ओव्हल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com