World Cup 2023 साठी इंग्लंडचा संघ जाहीर! बटलर कर्णधार, तर स्टोक्ससह 'या' अनुभवी खेळाडूंना मिळाली संधी

England Squad for World Cup 2023: भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी इंग्लंडचा १५ जणांचा संघ जाहीर झाला आहे.
England Team
England TeamDainik Gomantak

England Squad for World Cup 2023:

वनडे क्रिकेट वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी २८ सप्टेंबर संघ घोषित करण्याची अंतिम तारिख आहे. अशाच आता इंग्लंडने या स्पर्धेसाठी १५ जणांचा अंतिम संघ घोषित केला आहे.

इंग्लंडने यापूर्वी प्राथमिक संघ घोषित केला होता. पण आता त्यांनी अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघात अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्सही समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी त्याने वनडेतून निवृत्तीचा निर्णयही मागे घेतला आहे. मात्र, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांना मात्र संघात संधी मिळालेली नाही. आर्चर दुखापतीमुळे खेळणार नाही.

England Team
World Cup 2023 पूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह संघांना सतावतेय दुखापतींची चिंता, डझनभर खेळाडू जखमी

तसेच जेसन रॉयला पाठीची दुखापत झाली असल्याने हॅरी ब्रुकला संघात संधी मिळाली आहे. ब्रुकसाठी नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध झालेली वनडे मालिका फारशी खास ठरली नव्हती. मात्र, त्याची क्षमता आणि कौशल्य पाहून त्याच्यावर इंग्लंड बोर्डाने विश्वास कायम केला आहे.

दरम्यान, रॉय जर पूर्ण फिट झाला, तर त्याला संघात सामीलही केले जाऊ शकते, कारण २८ सप्टेंबरपर्यंत संघ बदलला जाऊ शकतो.

न्यूझीलंडविरुद्ध शानदार खेळ केलल्या डेव्हिड मलानलाही वर्ल्डकप संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर आदिल राशिद हा फिरकीपटूही संघात आहे. त्याला मोईन अलीची साथ मिळणार आहे.

England Team
World Cup 2023 साठी अश्विनची होणार टीम इंडियात एन्ट्री? कॅप्टन रोहित शर्मानेच दिले महत्त्वाचे संकेत

कर्णधार जोस बटलरसह जॉनी बेअरस्टो, मलान, जो रुट हे फलंदाजही संघात आहेत. याशिवाय स्टोक्सशिवाय, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, डेव्हिड विली हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. तसेच मार्क वूड आणि ख्रिस वोक्स या वेगवान गोलंदाजांची संघात निवड झाली आहे.

इंग्लंड गतविजेता संघ आहे. त्यामुळे यंदाही ते त्यांचे विश्वविजेतेपद राखण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. २०२३ वर्ल्डकपमधील सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात ५ ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे.

  • असा आहे वर्ल्डकप २०२३ साठी इंग्लंडचा संघ - जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com