विराट-बटलर यांच्या वादावर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन  म्हणाला…

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

जोस बटलर आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत होता, त्यावेळी विराट कोहलीने त्याला 'सेंड ऑफ' दिला होता.

अहमदाबाद: (England captain Eoin Morgan says ViratButler dispute) भारत-इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या पाचव्या टी-ट्वेन्टी सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर यांच्यात झालेल्या वादावर इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन याने प्रतिक्रीया दिली आहे. मॉर्गनने या वादासंबंधी पुढे चर्चा न करण्याचे सांगितले. पाचव्या टी-ट्वेन्टी सामन्यानंतर मॉर्गन पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘’विराट आणि बटलर यांच्य़ात कशासंबंधी वाद झाला ते मला माहित नाही. विराट हा अ‍ॅनिमेटेड खेळाडू आहे आणि तो जेव्हा खेळतो त्यावेळी त्याची भूमिका मोठी असते. त्याच्या आत मध्ये खूप भावना आहेत. जेव्हा सामने हे अटीतटीचे होतात, त्यावेळी लोक अशा चर्चेत येतात. हे काही नवीन नाही.’’ 

पाचव्या टी- ट्वेन्टी सामन्यात विराट आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज यांच्यात वाद झाला. जोस बटलर आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत होता, त्यावेळी विराट कोहलीने त्याला 'सेंड ऑफ' दिला होता. आणि तेच बटलरला आवडले नाही. यानंतर विराट आणि बटलर यांच्यात वाद सुरु झाल्यानंतर पंचांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने जोस बटलरला बाद करत इंग्लंडच्या संघाला दुसरा मोठा झटका दिला होता. (England captain Eoin Morgan says ViratButler dispute)

INDvsENG : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला बसला मोठा फटका 

पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन दिवसीय वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. उद्या 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल. त्य़ानंतर सर्व खेळाडू आगामी आयपीएलमध्ये व्यस्त होणार आहेत. पाचव्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये इंग्लंडला टीम इंडियाने 36 धावांनी मात दिली. इंग्लंडचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले होते. भारताने इंग्लंडच्या निर्णयाचे स्वागत इंग्लंडसमोर 224 धावांचे लक्ष ठेवले.

सलामीवीर रोहीत शर्मा आणि विराट यांची अर्धशतके आणि सूर्य़कुमार आणि हार्दिक पंड्य़ा यांच्या तूफान फटकेबादजीमुळे भारताला दोनशेपार पोहचता आले. तर दुसरीकडे सामन्याच्या उत्तरार्धात इंग्लंडला निर्धारीत 20 षटकांमध्ये 8 बाद 188 धावांपर्यंत पोहचता आले. भुनेश्वर कुमार सलामीवीर तर, विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 

संबंधित बातम्या