तब्बल १६ वर्षांनंतर पाकिस्तानात खेळणार इंग्लंडची क्रिकेट टीम

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्‍टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. या दौऱ्यात दोन ट्‌वेंटी २० सामने होतील. या लढती १४ आणि १५ ऑक्‍टोबरला अपेक्षित आहेत.

कराची :  इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्‍टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. या दौऱ्यात दोन ट्‌वेंटी २० सामने होतील. या लढती १४ आणि १५ ऑक्‍टोबरला अपेक्षित आहेत. भारतातील विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धेपूर्वी ही मालिका होणार आहे. ही मालिका झाल्यास इंग्लंड संघ १६ वर्षांनंतर पाकिस्तानात खेळणार आहे. मूळ कार्यक्रमानुसार हा दौरा जानेवारीत होणार होता.

संबंधित बातम्या