England Cricket Team
England Cricket TeamDainik Gomantak

England Cricket: पाकिस्तानची पनवतीच! इंग्लंड संघात व्हायरसची एन्ट्री

पाकिस्तान दौऱ्यावर गेलेले इंग्लंड क्रिकेट संघातील १४ सदस्य कसोटी मालिकेपूर्वी आजारी पडले आहेत

England Cricket: इंग्लड क्रिकेट संघ तब्बल 17 वर्षांनी कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला आहे. ही कसोटी मालिका 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लड संघातील सपोर्ट स्टाफ सदस्य आणि खेळाडू मिळून तब्बल 14 जण आजारी पडले आहेत.

त्यामुळे या सदस्यांना बुधवारी हॉटेलमध्येच आराम करण्यास सांगण्यात आले आहे. या सदस्यांना व्हायरसची लागण झाली असल्याचे रिपोर्ट्समधून समजते. पण, ही कोरोनाची प्रकरणे नाहीत. मंगळवारी काही खेळाडूंनी बरं वाटत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता त्यांना आराम करण्यास सांगण्यात आले आहे.

England Cricket Team
IND vs NZ, 3rd ODI: टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं! पावसाची जोरदार 'बॅटिंग'

आजारी पडलेल्या सदस्यांमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, जॅक लीच यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच जो रुटलाही (Joe Root) लक्षणे जाणवत होती, पण तो बरा झाल्याने सरावासाठी उपलब्ध होता, असे समोर आले आहे. इंग्लंडमधील (England Cricket Team) आजारी असलेल्या सदस्यांना उलटी आणि जुलाबाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे आता खेळाडू 24 तासांच्या आत बरे होतील, अशी आशा इंग्लंडला आहे.

England Cricket Team
Ruturaj Gaikwad on MS Dhoni: सलग 7 षटकार ठोकणारा ऋतुराज म्हणतोय, 'धोनीकडून शिकलोय की...'

दरम्यान, स्टोक्सही आजारी असल्याने मालिकेच्या ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच आता रावळपिंडी येथे होणारा पहिला सामना निर्धारित दिवशी सुरू होणार का की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता इंग्लंड संघाचे डॉक्टरांनी अंतिम निर्णय दिल्यानंतरच सामन्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो.

महत्त्वाचे म्हणजे इंग्लंडने यापूर्वीच पहिल्या सामन्यासाठी त्यांचा 11 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात जॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रुट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन या खेळाडूंचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com