England vs Senegal: इंग्लंडच्या विजयी रथाची घौडदौड कायम, सेनेगलला पराभूत करत क्वार्टर-फायनलमध्ये धडक

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत इंग्लंडने उपउपांत्यपूर्व फेरीत सेनेगलला पराभूत करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
Harry Kane
Harry KaneDainik Gomantak

फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत सध्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने सुरू आहेत. या फेरीत सोमवारी रात्री उशीरा इंग्लंड विरुद्ध सेनेगल संघात सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने सेनेगलवर 3-0 अशा गोलफरकाने विजय मिळवला. यासह इंग्लंडने दहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

इंग्लंड संघाने (England) हा विजय मिळवत आपली विजयी रथ कायम केला आहे. या वर्ल्डकपमध्ये दमदार फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडकडून सेनेगलविरुद्ध जॉर्डन हेंडरसन, कर्णधार हॅरी केन (Harry Kane) आणि बुकायो साका यांनी गोल करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे इंग्लंडचा रहीम स्टर्लिंग या सामन्यात खेळू शकला नाही.

Harry Kane
FIFA World Cup 2022 : जर्मनीच्या एक्झिटनंतर कतारमधील टीव्ही प्रेझेंटेटर्सनी उडवली खिल्ली, पाहा Video

सेनेगलने (Senegal) पहिल्या हाफमध्ये चांगली लढत दिली होती. त्यांना काही चांगल्या संधीही मिळाल्या. पण नंतर इंग्लंडने सामन्यात वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. इंग्लंडला हेंडरसनने 38 व्या मिनिटाला गोल करून आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर इंग्लंडच्या आत्मविश्वासात वाढ झाली आणि त्यांनी नंतर मागे वळून पाहिले नाही.

पहिल्या हाफनंतरच्या ज्यादा वेळेत हॅरी केनने इंग्लंडसाठी दुसरा गोल नोंदवत ही आघाडी आणखी वाढवली. नंतर दुसऱ्या हाफमध्ये साकाने 57 व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला या सामन्यात भक्कम स्थितीत उभे केले. त्यानंतर सेनेगलला सामन्यात पुनरागमन करणे कठीण झाले. त्यातच त्यांना इंद्रिस जे आणि शेखो कुवेत यांची कमी अधिक भासली.

दरम्यान, आता इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असल्याने त्यांचा सामना गतविजेत्या फ्रान्सविरुद्ध 11 डिसेंबर रोजी होणार आहे. फ्रान्सने उपउपांत्यपूर्व फेरीत पोलंडचा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com