England Vs Pakistan: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

England Squad For Tour Of Pakistan: डिसेंबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर करण्यात आला आहे.
England Team
England TeamDainik Gomantak

England Squad For Tour Of Pakistan: डिसेंबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर करण्यात आला आहे. सरे चा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्सचा प्रथमच इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, इंग्लंडचा (England) संघ पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर 3 कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 1 डिसेंबरला रावळपिंडीत, तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 9 डिसेंबरपासून मुलतानमध्ये होणार आहे. त्याच वेळी, शेवटचा कसोटी सामना 17 डिसेंबरपासून कराची (Karachi) स्टेडियमवर खेळवला जाईल.

England Team
India vs England:...पण अश्विनचा हा अप्रतिम झेल पाहा VIDEO

तसेच, कीटन जेनिंग्सचे फेब्रुवारी 2019 नंतर प्रथमच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कसोटी संघात पुनरागमन झाले आहे, तर दुसरीकडे बेन डकेटला नोव्हेंबर 2016 नंतर प्रथमच इंग्लंडच्या कसोटी संघात संधी मिळाली आहे.

शिवाय, 2005 नंतर प्रथमच इंग्लंडचा संघ पाकिस्तानात जाऊन कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी 2005 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी मालिका खेळली होती, ज्यामध्ये पाकिस्तान विजेता ठरला होता. 2005-06 मध्ये 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा पाकिस्तानकडून 2-0 असा पराभव झाला होता.

England Team
India vs England series: इंग्लंड विरुद्ध कोण उतरेल रोहित सोबत सलामीला?

इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, हॅरी ब्रुक, जॅक क्रोली, बेन डकेट, बेन फॉक्स, विल जॅक्स, कीटन जेनिंग्स, जॅक लीच, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रुट, मार्क वुड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com