''शेवटच्या निर्णायक सामन्यात खेळपट्टी अधिक बिकट असेल''  

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात आला. तर तिसरा डे नाईट सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला असून, शेवटचा आणि निर्णायक सामना देखील याच मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात आला. तर तिसरा डे नाईट सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला असून, शेवटचा आणि निर्णायक सामना देखील याच मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर खेळपट्टीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. खेळपट्टीवरून चाललेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा विकेटकिपर फलंदाज बेन फोक्सने आज यजमान भारत आगामी सामन्यासाठी खेळपट्टीचे रूप अजून बदलणार असल्याचे संघाला माहित असल्याचे सांगितले. 

बेन फोक्सने तिसऱ्या डे नाईट कसोटी सामन्याबाबत बोलताना खेळपट्टीची परिस्थिती बिकट होती, मात्र भारतीय संघाने चांगला खेळ केल्याचे सांगितले. तसेच भारतीय संघाकडे सर्वोत्तम फिरकीपटू असल्याचे म्हणत, इंग्लंडच्या संघाकडे याचे उत्तर नसल्याचे म्हटले आहे. परंतु आगामी सामन्यात मोठी धावसंख्या  उभारणे हेच प्रत्त्युत्तर राहणार असल्याचे बेन फोक्सने आज मुलाखतीत सांगितले. याशिवाय शेवटच्या कसोटी सामन्यात खेळपट्टीविषयी कशी असले याचा अंदाज आला असल्याचे बेन फोक्सने पुढे सांगितले. अंतिम कसोटी सामन्यात खेळपट्टी अजून बिकट राहणार असून, सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून बॉल पूर्णपणे वळणार असल्याचे बेन फोक्स म्हणाला. व अशा परिस्थितीत चांगला खेळण्याचा मार्ग शोधणार असल्याचे त्याने नमूद केले. 

ICC Test Rankings : हिटमॅन रोहित शर्मा आणि अश्विनची दमदार झेप  

तसेच, आतापर्यंत झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टीवर तग धरणे सर्वात कठीण आणि आव्हानात्मक होते असे बेन फोक्सने सांगितले. त्यानंतर शेवटच्या डे नाईट सामन्यात तर गुलाबी चेंडू घसरत असल्याचे व इतक्या जास्त प्रमाणात वळत असल्याचे कधीच पाहिले नव्हते, असे तो म्हणाला. आणि मागील दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी, मालिका अनिर्णित राखण्याच्या स्थितीत असल्याचे बेन फोक्सने मुलाखतीत सांगितले. व त्यासाठी संघाला चांगली कामगिरी करावी लागेल, असे तो म्हणाला. 

आशिया चषक रद्द झाल्यास त्याला भारत जबाबदार असेल; पाकचा आरोप

त्यानंतर, तिसऱ्या कसोटी सामन्यात मोठा प्रयत्नच केला नसल्यामुळे संघाला लवकर सामना गमवावा लागला असल्याचे बेन फोक्सने सांगितले. आणि शेवटच्या कसोटी विजय मिळवल्यास ती एक ऐतिहासिक कामगिरी ठरणार असल्याचे इंग्लंडचा विकेटकिपर म्हणाला. त्यामुळे मागील सामान्यापेक्षा आगामी सामन्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक असल्याचे म्हणत, तसे झाल्यास सामन्यात मोठी संधी मिळणार असल्याचे बेन फोक्सने अधोरेखित केले. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या शेवटच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्धचा खेळणारा संघ निवडला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यास किंवा सामना अनिर्णित राखल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचेल. तर तिसरा कसोटी सामना गमावल्यामुळे इंग्लंडचा संघ  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रेस मधून बाहेर पडला आहे.              

संबंधित बातम्या