IndvsEng 1st test 1Day : इंग्लंडची दिमाखदार सुरुवात

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे.

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 3 विकेट्सवर 263 धावा केल्या आहेत. कर्णधार जो रूट 128 धावांवर फलंदाजी करत आहे.  

एटीके मोहन बागानसाठी आयती संधी फक्त एक विजय नोंदविलेल्या तळाच्या मोहन...

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर रॉरी बर्न्स आणि डोम सिब्ली यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 60 हून अधिक धावांची भागीदारी केली. पण 33 धावांच्या वैयक्तिक धावांवर रुषभ पंतने  बर्न्सला झेलबाद केले. रूटने 12 चौकारांच्या मदतीने 164 व्या चेंडूत शतक पूर्ण केले. असे करणारा तो इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस जसप्रीत बुमराहने डोम सिब्लेला पायचीत केले. व यासह भारताला तिसरे यश मिळवून दिले. विकेट पडल्यानंतरच पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याची घोषणा केली.

भारताकडुन रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रुषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, शाहबाज नदीम, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे अकरा खेळाडु खेळत आहेत.आणि इंग्लंडकडुन रॉरी बर्न्स, डोम सिब्ले, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (विकेटकिपर), डोम बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन खेळाडु खेळत आहेत. 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका खूप महत्वाची आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रत्येक सामना रोमांचक असणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर भारतातील हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जानेवारी 2020 मध्ये भारतात आयोजित करण्यात आले होते. यानंतर फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यात येत आहे.  

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 122 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 26  कसोटी सामने भारताने जिंकले आहेत, तर इंग्लंडच्या संघाने  47 वेळा विजय मिळवला आहे. आणि आतापर्यंत दोन्ही संघातील 49 सामने अनिर्णित राहिले आहेत. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर 9 सामने खेळले गेले असून, त्यातील 5 सामने भारताने जिंकले आहेत. व 3 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी इंग्लड विरुध्दची 3 - 0 जिंकावी लागणार आहे.   

संबंधित बातम्या