फुटबॉल हेराफेरीप्रकरणी चौकशी समिती

किशोर पेटकर
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

जीएफए अध्यक्ष आलेमाव यांची माहितीनिवृत्त न्यायमूर्तींकडे जबाबदारी शक्य

पणजी

गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत गेल्या वर्षी झालेल्या सहा सामन्यांबाबत आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) संशय व्यक्त केल्यानंतरअखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निर्देशानुसार गोवा फुटबॉल असोसिशनने (जीएफए) पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचे ठरविले आहे.

चर्चिल आलेमाव गोवा विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाचे बाणावलीचे आमदार आहेत. त्यांनी सांगितलेकी ‘‘याप्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्ती करण्यात येईल. समितीचे नेतृत्व शक्यतो निवृत्त न्यायमूर्ती करतीलतसेच समितीत वकिल व इतरांचा समावेश असेल.’’ एएफसीच्या अहवालात सामना हेराफेरीसंदर्भात संशयास्पद सट्टेबाजी पद्धतीचा वापर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले. संशयास्पद सट्टेबाजी नमुन्यांच्या आधारे संशय असलेल्या सामना निकाल निश्चिती संदर्भात चौकशी होणे आवश्यक आहे यावर आमदार आलेमाव यांनी भर दिला.  

एएफसीने एआयएफएफचे नैतिकता अधिकारी जावेद सिराज यांना मार्चमध्ये पत्र पाठवून गोवा प्रो-लीग स्पर्धेतील गतवर्षी १६  ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या सहा सामन्यांतील संशयास्पद हेराफेरीबाबत माहिती दिली होती. प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगुट असोसिएशनपणजी फुटबॉलर्सगार्डियन एंजल स्पोर्टस क्लबएफसी गोवा (द्वितीय)माजी आय-लीग संघ धेंपो स्पोर्टस क्लबस्पोर्टिंग क्लब द गोवा व साळगावकर एफसी या सात संघांचा समावेश असलेल्या सामन्यांबाबत संशय आहे. गोवा प्रोफेशनल लीगमधील सामना निकाल निश्चिती प्रकरणसंदर्भात आशियाई फुटबॉल महासंघाने लंडनस्थित स्पोर्टसरडार कंपनीची नियुक्ती केली होती.

गोवा प्रो-लीग स्पर्धेतील सामन्यांबाबत  एफसीला जाणवलेल्या संशयासंदर्भात सट्टेबाजी पद्धतीचा पुरावा असून निकाल निश्चिती दर्शवत असलेतरी खरोखरच सामना निकाल निश्चिती झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे नसल्याचेअसे जीएफएचे म्हणणे आहे.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या