गोव्यात आजपासून रंगणार मास्टर्स क्रीडापटूंच्या ‘एन्थू कार्निव्हल २०२०’ बॅडमिंटन स्पर्धा ..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्टर्स खेळाडूंचा ‘एन्थू कार्निव्हल २०२०’ रंगणार आहे, त्यात ३५ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू भाग घेतील. स्पर्धेस आज सुरवात होईल आणि अंतिम लढती शनिवारी (ता. २८) होतील. 

पणजी :  कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्टर्स खेळाडूंचा ‘एन्थू कार्निव्हल २०२०’ रंगणार आहे, त्यात ३५ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू भाग घेतील. स्पर्धेस आज सुरवात होईल आणि अंतिम लढती शनिवारी (ता. २८) होतील. 

बॅडमिंटन स्पर्धेत देशाच्या विविध भागातील सुमारे १२० मास्टर्स बॅडमिंटनपटू भाग घेतील. देशातील मास्टर्स बॅटमिंटनपटूंची स्पर्धा एन्थू स्पोर्टस यांच्यातर्फे यापूर्वी औरंगाबाद, गोवा आणि डेहराडून येथे घेण्यात आली होती. गोव्यातील मागील स्पर्धा जानेवारी २०१८ मध्ये झाली होती. तेव्हा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते तेव्हा स्पर्धेचे उद्‍घाटन झाले होते. यावेळी बॅडमिंटनसह टेबल टेनिस, बीच फुटबॉल, बीच व्हॉलिबॉल या खेळांचाही समावेश आहे. आयोजक एन्थू ग्रुपला पणजी बॅडमिंटन क्लब व पणजी टेबल टेनिस क्लबचे सहकार्य लाभत आहे. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक सावधगिरी, तसेच मार्गदर्शक शिष्टाचाराचे पालन करून स्पर्धा होतील, असे एन्थू कटलेट्स या व्हॉट्सॲप ग्रुपचे संस्थापक सदस्य बिभाष चटर्जी यांनी सांगितले. 

 

संबंधित बातम्या