दुखापतीमुळे इऑन मॉर्गन मालिकेच्या बाहेर; एक नवा खेळाडू करणार पदार्पण

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यापूर्वीच, इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंड आणि भारतामध्ये सध्या तीन 'एकदिवसीय सामन्यांची' मालिका सुरु असून,उद्या  या मालिकेचा दुसरा सामना रंगणारआहे. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यापूर्वीच, इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच  एकदिवसीय सामन्यात गंभीर जखमी झाल्यामुळे कर्णधार इऑन मॉर्गनल या मालिकेच्या बाहेर पडावे लागले आहे. तर, इऑन मॉर्गनच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी पुढच्या सामन्यांमध्ये विकेटकिपर फलंदाज जोस बटलर सांभाळणार असल्याचे समजते आहे. (Eoin Morgan out of the one day series due to injury)

मालिकेच्या पहिल्याच  सामन्यात क्षेत्ररक्षण करताना, इंग्लंड संघाचा कर्णधार इऑन मॉर्गनला(Eoin Morgan) गंभीर दुखापत झाली. या घटनेत त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला व बोटाला गंभीर दुखापत झाली असून, या दुखापतीमुळे त्याच्या हाताला चार टाके पडल्याची माहिती मिळाली आहे.'आपण किमान 24 तास थांबू इच्छितो, सध्या आपण काहीच बोलण्याच्या परिस्थिती नाही' असे इऑन मॉर्गनने  या घटने नंतर सांगितले होते. तसेच  इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कर्णधार  इऑन मॉर्गनला झालेल्या दुखापतीविषयी माहिती देताना मॉर्गन सध्या मालिकाबाहेर असणार आहे असे स्पष्ट केले. तसेच मॉर्गनसोबत पहिल्या मॅचमध्ये जखमी झालेला फलंदाज सैम बिलिंग्स हा सुद्धा पुढच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट द्वारे या घटनेची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने(England Cricket Board) 'संघाचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत', असे सांगितले. तर एक नवीन खेळाडू पुढच्या सामन्यात पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे.लियाम लिव्हिंगस्टोन या खेळाडूला पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळत असून, या पूर्वी टी-ट्वेन्टी सामना खेळलेला हा खेळाडू पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे.  

IPL 2021: धोनीने नवी जर्सी लॉन्च करताच जडेजाने केली स्पेशल डिमांड 

संबंधित बातम्या