ईपीएल : पॉल पोग्बाच्या एकमेव गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा बर्नले वर विजय 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड संघाने बर्नले संघावर दमदार विजय मिळवत क्रमवारीतील आपले पहिले स्थान राखले आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड संघाने बर्नले संघावर दमदार विजय मिळवत क्रमवारीतील आपले पहिले स्थान राखले आहे. मँचेस्टर युनायटेड आणि बर्नले यांच्यात काल झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडच्या पॉल पोग्बा याने केलेल्या गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने बर्नलेचा 1 - 0 ने पराभव केला. 

ISL: ईस्ट बंगालसमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान

मँचेस्टर युनायटेड आणि बर्नले यांच्यात झालेल्या सामन्यात, खेळाच्या पहिल्या सत्रात कोणत्याच संघाला गोल नोंदवता आला नाही. मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रात मँचेस्टर युनायटेडच्या पॉल पोग्बाने 71 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. व ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवल्यामुळे मँचेस्टर युनायटेडने बर्नले विरुद्धचा सामना 1 - 0 ने आपल्या खिशात घातला. 

दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत मँचेस्टर युनायटेडचा संघ पहिल्या स्थानावर पोहचला आहे. मँचेस्टर युनायटेडच्या संघाने 17 सामन्यांपैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवत 36 अंकांसह पहिले स्थान मिळवले आहे. त्यानंतर लिव्हरपूलच्या संघाने 17 सामन्यांपैकी 9 लढतीत विजय मिळवलेला आहे. व त्यांचे 33 अंक आहेत. यानंतर मँचेस्टर सिटीचा संघ तिसऱ्या स्थानी असून, मँचेस्टर सिटी संघाने 16 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने 32 गुण झाले आहेत. तर लिसेस्टर सिटी चौथ्या आणि एव्हर्टोन पाचव्या स्थानावर आहे.     

संबंधित बातम्या