Euro 2020 : रोनाल्डोच्या सुपर किकमुळे पोर्तुगल बाद फेरीत दाखल

Euro 2020  Cristiano Ronaldo super kick puts Portugal in the knockout stages
Euro 2020 Cristiano Ronaldo super kick puts Portugal in the knockout stages

पोर्तुगालच्या (Portugal) क्रिस्तिआनो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या सुपर किकने पोर्तुगलने बाद फेरीत प्रवेश केला आहे. दोन पेनल्टी किकच्या जोरावर पोर्तुगालने फ्रान्सला (France) २-२ असे बरोबरीत राखले आहे. यामुळे या दोन्ही संघांनी युरो २०२० च्या बाद फेरीत (knockout stages) प्रवेश केला आहे.

या रोमांचक सामन्यात पोर्तुगलकडून रोनल्डो तर फ्रान्सकडून बेंन्झेमानने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने पाच वर्षांनी गोल करत धडाक्यात पुनरागमन केले. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघानी अफलातून खेळ केला. दोन्ही संघांना एकही गोल करणे जमले नाही. भरापाई वेळेत ३१ व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत आघाडी घेतली परंतु भरापाई टाईमच्या दुसऱ्या हाफमध्ये बेंन्झेमानने पेनल्टी शूटमध्ये पुन्हा एक गोल केला आणि २-१ अशी आघाडी घेतली. पण रोनाल्डोने आपली कमाल दाखवत ६० मिनिटाला गोल केल्याने सामना २-२ असा बरोबरीत सुटला. बाद फेरीत पोर्तुगलचा सामना फ्रन्स सोबत होणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com