EURO 2020: पोर्तुगालच्या 'या' 4 फुटबॉलपटूंवर असेल विशेष लक्ष्य

EURO 2020: पोर्तुगालच्या 'या' 4 फुटबॉलपटूंवर असेल विशेष लक्ष्य
EURO 2020: Portugal's 'Ya' 4 footballers will be a special target

EURO 2020 ला सुरुवात झाली असून इंग्लंड (England), इटली (Italy), बेल्जियम (Belgium) या देशांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. आता सगळ्यांचे लक्ष्य पोर्तुगालवर आहे.  पोर्तुगालचा (Portugal)  पहिला सामना मंगळवारी हंगेरी यांच्या विरुद्ध होणार आहे. ग्रुप फ (Group F) मध्ये पोर्तुगाल बरोबर हंगेरी, फ्रांस आणि जर्मनी हे संघ  असुन हा ग्रुप, सगळ्यात कठीण म्हणजेच ‘ग्रुप ऑफ डेथ’ (Group of Death) म्हणून ओळखला जात आहे. (EURO 2020: Portugal's 'Ya' 4 footballers will be a special target) 

पोर्तुगालनी 2016 चा युरो कपमध्ये (EURO 2016) फ्रांसला नमवत 1-0 असा जिंकला होता. फिफाच्या क्रमवारीत पोर्तुगाल हा पाचव्या स्थानी आहे. 2016 प्रमाणे, युरो 2020 चे विजेतेपद देखील आपल्याकडे राहावे असे अनेक पोर्तुगालच्या फॅन्सला वाटत आहे. ‘ग्रुप ऑफ डेथ’ मध्ये असणारा पोर्तुगाल हा मोठ्या संघांना धक्का देऊ शकतो यात काहीच दुमत नाही. पोर्तुगालचे संघ व्यवस्थापक फर्नांडो सॅनटोस देखील आपल्या संघावर मेहनत घेताना दिसत आहेत. तरुण आणि अनुभवी अशा खेळाडूंचा एकत्रित मिलाफ असणाऱ्या या संघाला यंदा युरो कपवर आपले नाव कोरायचे असल्यास विशेष कामगिरी नक्कीच करावी लागणार आहे. कारण जर्मनी आणि फ्रांस सारख्या बलाढ्य संघाला हरवणे तितकेसे सोपे नाही.

युरो 2020 मध्ये कुठल्या पोर्तुगालच्या ‘या खेळाडूंवर असेल विशेष लक्ष्य:

क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)

फुटबॉल जगताचा राजा आणि पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत पहिला आहे. रोनाल्डोवर (Ronaldo) संघाची मदार असेल. गोल मशीन म्हणून ओळख असलेल्या रोनाल्डोला या युरो कपमध्ये विश्वविक्रमची सुवर्ण संधी आहे. त्याने या स्पर्धेत 6 गोल केले तर तो जगातील सगळ्यात जास्त गोल करणारा खेळाडू असेल. पोर्तुगाल कडून खेळताना त्याच्या नावावर सध्या 103 गोल आहेत. या यादीत इराणचे अली दाई प्रथम क्रमांकावर असून, त्यांच्या नावावर 109 गोल आहेत. वयाच्या 36 व्या वर्षी जरी रोनाल्डो खेळत असला, तरी त्याच्या खेळाची सर अजून कुठल्याही पोर्तुगालच्या खेळाडूमध्ये दिसत नाही. अनेकांचे असे म्हणणे आहे की, ही युरो स्पर्धा रोनाल्डोसाठी शेवटची असेल म्हणून त्याचे फॅन्स देखील आपल्या लाडक्या प्लेअरने या स्पर्धेत चांगला खेळ करत पोर्तुगलने युरो कपवर आपले नाव कोरावो ही अपेक्षा आहे.

ब्रुनो फर्नांडिस (Bruno Fernandes)

रोनाल्डो नंतर जे नाव गेल्या काही महिन्यांपासून पोर्तुगालमध्येच नाही तर पूर्ण जगात चर्चेत आहे ते नाव म्हणजे ब्रुनो फर्नांडिस. अफलातून मिड-फिल्डर म्हणून ओळख असणाऱ्या फर्नांडिसवर पोर्तुगाल संघाच्या मिड-फिल्ड ची जबाबदारी असेल. मँचेस्टर युनाइटेड करून खेळणारा ब्रुनो गेल्या काही दिवसांपासून तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने २८ आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त ४ वेळा गोल मारले असले,  तरी तो उत्कृष्ट पासेस देण्यात माहीर आहे. त्यामुळे रोनाल्डोला भक्कम आधार म्हणून ब्रुनोकडे पाहण्यात येत आहे. अगदी लहानपणापासूनच त्याच्यात दृढनिश्चय होता तो आज त्याच्या खेळात स्पष्टपणे दिसून येतो, उत्तीर्णतेवर, कामगिरीवर आणि बचावात्मक खेळाच्या बाजुवर काम करणारा ब्रुनो लक्ष्य वेधून घेईल अशी आशा आहे.

जो फेलिक्स (Joao Felix)

21 वर्षांचा फेलिक्स हा पाच वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे.  जेव्हा अ‍ॅटलेटिको माद्रिदने (Atletico Madrid) 2019  मध्ये बेनिफिकाकडून 126 दशलक्ष युरो देण्याचे कबूल केले तेव्हा तो फक्त 19 वर्षांचा होता. मैदानाच्या दोन्ही बाजूंनी म्हणजे फुटबॉल भाषेत विंग्स वरून खेळणारा फेलिक्स हा भविष्यात रोनाल्डो सारखा बनेल असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. अ‍ॅटलेटिको माद्रिदला 2021 चा ‘ला लिगा’ (La Liga) जिंकवून देण्यात या खेळाडूचा मोलाचा वाटा आहे. फेलिक्स हा नवीन पोर्तुगीज पिढीचेही प्रतीक म्हणून मानला जातो. युरो 2020 मध्ये फेलिक्सला त्याचा आदर्श असलेल्या रोनाल्डो बरोबर खेळायला मिळेल. चपळ फेलिक्स हा समोरील संघासाठी मोठा धोका ठरू शकतो.

रूबेन डियास (Ruben Dias)

रूबेन डियास याला पोर्तुगालचा डिफेन्स सांभाळेल. पेपे,  नेल्सन सेमेडो, जोसे फोंते अशा इतर डिफेंडर बरोबर रूबेन डियास आपल्याला दिसेल. मँचेस्टर सिटीकडून (Manchester City) खेळणारा डियास हा नुकताच  Premier League Player of the Season चा मानकरी ठरला आहे. हा 24 वर्षीय खेळाडू पोर्तुगालचा स्टार डिफेंडर आपल्या खेळीने बड्या बड्या खेळाडूंना गोल मारण्यापासून लांब ठेऊ शकतो. फॉर्मात असलेला डियास एक अतुलनीय जिंकणारी मानसिकता ठेवतो. त्याला अद्याप या विशिष्ट खेळीसाठी व्यापकपणे जरी ओळखले गेले नाही, परंतु EPL च्या हंगामात जे पाहिले आहे त्यावरून रुबेन नक्कीच पोर्तुगालमधील आतापर्यंतच्या महान डिफेंडर बनण्याच्या मार्गावर आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com