Euro Cup: कोका कोला कंपनीला रोनाल्डोच्या 'त्या' कृतीमुळे जबर फटका

ronaldo.jpg
ronaldo.jpg

पत्रकार परिषदेदरम्यान(Press conference) पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) कोको कोलाच्या (coca cola) बाटल्या बाजूला केल्यामुळे ब्रॅंडला चांगलाच फटका बसला आहे. युरो कप 2022 स्पर्धेनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोच्या एका कृतीमुळे कंपनीला सुमारे चार बिलियन डॉलर्सचा अर्थात 29 हजार 352 कोटीचं नुकसान झाले आहे.

2020 युरो कप स्पर्धेत 'ग्रुप ऑफ डेथ' (Group of Death) अशी ओळख असलेल्या एफ गटामध्ये हंगेरीविरुध्द (Hungary) होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी त्याने आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं  पाहिले. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातामध्ये घेऊन पाणी असं म्हणत एका प्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले.

कोका कोला कंपनीला रोनाल्डोची ही कृती महागात पडली असून 1.6 टक्क्यांनी शेअर्स खाली घसरले आणि सुमारे चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे. कोका कोला कंपनीची किंमत 242 बिलियन डॉलर्सवरुन 238 वर आली आहे.

पोर्तुगालची हंगेरीवर 3-0 ने मात
दरम्यान, पोर्तुगालने (Portugal) मैदानामध्ये शेवटच्या दहा मिनिटात चमत्कारिक खेळ करत हंगेरीला 3-0 ने पराजीत केले. सामन्याच्या 80 व्या मिनिटांपर्यंत शांत असलेला पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने विक्रमी 2 गोल करत स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 60 हजारपेक्षांही जास्त चाहत्यांची मने जिंकली. रोनाल्डोने इस्त्रायलविरुध्दच्या (Israel) मैत्रीपूर्ण सामन्यात 104 वा गोल नोंदवला होता. त्यामुळे हंगेरीविरुध्दची कामगिरी धरुन रोनाल्डोच्या खात्यामध्ये आता 106 आंतरराष्ट्रीय गोल जमा झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com