ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनादेखील कोहलीचा खेळ आवडतो

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

विराट कोहलीला स्लेजिंग करण्याचा पयत्न करू नका, त्यामुळे त्यालाच सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणा मिळू शकते, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव वॉने दिलेला असला तरी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने रणशिंग फुंकलेच!

सिडनी :  विराट कोहलीला स्लेजिंग करण्याचा पयत्न करू नका, त्यामुळे त्यालाच सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणा मिळू शकते, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव वॉने दिलेला असला तरी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने रणशिंग फुंकलेच! विराट हा आमच्यासाठी एक सर्वसामान्य खेळाडू आहे, स्पर्धक म्हणून आम्ही त्याचा लाडाने तिरस्कार करतो, पण ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना मात्र त्याचा खेळ आवडतो, असे विधान पेनने केले आहे.

विराटबाबत मला नेहमीच प्रश्‍न विचारले जातात, तो माझ्यासाठी केवळ इतर खेळाडूंप्रमाणे खेळाडू आहे, त्यामुळे मला त्याचे महत्त्व वाटत नाही. मी त्याला कसोटीत नाणेफेकीच्या वेळी भेटणार आहे आणि त्याच्याविरुद्ध खेळणार आहे, असे पेनने सांगितले.
प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही त्याचा तिरस्कार करत असलो तरी क्रिकेट प्रेक्षकांना त्याची फलंदाजी पाहायला आवडते, क्रिकेटच्या मैदानात तो रोमहर्षक आणि थरारक वातावरण निर्माण करतो, त्याची फलंदाजी पाहाणे हे नयनरम्य असते, असही पेनने सांगितले. 

पेन वि. विराट एकाच सामन्याचे द्वंद
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पेनने विराटच्या विरोधात रणशिंग फुंकले असले तरी हे दोघेही एकाच सामन्यात आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यात पेनचा समावेश नाही, तर विराट कोहली पहिलाच कसोटी सामना खेळून मायदेशी परतणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका
२७ नोव्हेंबर     पहिला एकदिवसीय सामना                सिडनी
२९ नोव्हेंबर    दुसरा एकदिवसीय सामना                  सिडनी
२ डिसेंबर    तिसरा एकदिवसीय सामना                  कॅनबेरा
४ डिसेंबर    पहिला टी-२० सामना                          कॅनबेरा
६ डिसेंबर     दुसरा टी-२० सामना                           सिडनी
८ डिसेंबर    तिसरा टी-२० सामना                           सिडनी
१७ डिसेंबर    पहिला कसोटी सामना                       ॲडिलेड
२६ डिसेंबर    दुसरा कसोटी सामना                         मेलबर्न
७ जानेवारी    तिसरा कसोटी सामना                       सिडनी
१५ जानेवारी    चौथा कसोटी सामना                      ब्रिस्बेन

संबंधित बातम्या