IPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले

दैनिक गोमंतक
सोमवार, 17 मे 2021

आयपीएलच्या विविध संघांमध्ये खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) खेळलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि स्टीव्ह स्मिथ (Stiven Smith) यांच्यासह, कोरोनाच्या साथीच्या (Coronavirus) आजाराची स्थिती बिघडल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू काही दिवस मालदीवमध्ये होते.  सोमवारी ते सिडनी येथे दाखल झाले. भारतातील बिघडलेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या उड्डाण्णांवर बंदी घातली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमधून आता मायदेशी पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या तुकडीत मालदीवमध्ये 10 दिवस घालवल्यानंतर आज सकाळी सिडनी विमानतळावर दाखल झालेले खेळाडू, अधिकारी आणि समालोचक यांच्यासह एकूण 38 सदस्यांचा समावेश होता. (Eventually the Australian players reached home)

IND vs SL: मोठा धोका; भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द होऊ शकतो?

आयपीएलच्या विविध संघांमध्ये खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाने कोविडच्या दुसर्‍या लाटेशी लढा देणार्‍या भारताकडून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली होती, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू थेट मायदेशी परत येऊ शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आता दोन आठवडे विलगीकरणात रहावे लागणार आहे. राष्ट्रीय प्रसारक एबीसीच्या म्हणण्यानुसार एअर सेशेल्सच्या विमानाने ऑस्ट्रेलियामध्ये आलेल्या स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner), दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आदींचा समावेश होता. शुक्रवारी कोविड-19 चा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीही रविवारी दोहा मार्गे सिडनीला पोहोचेल.

AFC Champions League: एफसी गोवास आगामी मोसमात लाभ होण्याची आशा 

दरम्यान, काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्यात आला होता. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचे संदीप वॅारिअर, वरून चक्रवर्थी हे खेळाडू  कोविड पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर अनेक लोक, माजी खेळाडू आयपीएल रद्द करा म्हणून आवाज उठवू लागले. त्यानंतर बीसीसीआयने  निर्णय घेऊन आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. आता आयपीलचे उर्वरित सामने कुठे होणार आणि कधी होणार हे अजून निश्चित झालेले नाही.

    

संबंधित बातम्या