
पणजी : गोव्याच्या समैरा भंडारे हिने पुण्यात झालेल्या सीएसके आय स्क्वॉश स्पर्धेत स्पर्धेत चमक दाखविली. राष्ट्रीय पातळीवरील ‘3 स्टार’ दर्जाच्या या स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक पटकावला.
भारतीय स्क्वॉश रॅकेट महासंघ आणि महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण 563 प्रवेशिका होत्या. 21 राज्यांतील खेळाडू 16 गटात सहभागी झाले होते.
समैराने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत दिल्लीच्या आराध्या पोरवाल हिच्यावर 11-9, 9-11, 11-3, 11-9 अशी मात केली. नंतर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत तिने मुंबईच्या पिया सिंग हिला 3-1 फरकाने हरविले. समैरा नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये दहाव्या इयत्तेत शिकते व तिच्या वयोगटात ती गोव्याची अव्वल मानांकित खेळाडू आहे.
वयाच्या नवव्या वर्षी तिने वास्को येथील एनओआय केंद्रात रेहमान हुबळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्क्वॉशचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. सध्या तिला चंडीगडचे सीनियर प्रशिक्षक खुशवंत सिंग यांचे मार्गदर्शन लाभते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.