भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांनाही इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 1 जून 2021

3 जून रोजी लंडनसाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघ जाणार आहेत. त्यांच्यासोबतच खेळाडूंच्या कुटुंबांना देखील इंग्लंड सरकारने परवानगी दिली आहे.

इंग्लंड दौर्‍यावर येणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबासोबत येण्यास इंग्लंड क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली आहे.  

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. पुरुष संघासोबत भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. पुरुष संघ दौरा चार महिन्यांच्या आसपास आहे. तर महिला संघ एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी -20 सामने खेळणार आहेत. 

IND vs NZ : जागतिक कसोटीचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना हिरवा कंदील 

3 जून रोजी लंडनसाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघ जाणार आहेत. त्यांच्यासोबतच खेळाडूंच्या कुटुंबांना देखील इंग्लंड सरकारने परवानगी दिली आहे. लंडहून दोन्ही पथके साऊथॅम्प्टन येथे जातील, जेथे ते त्यांना 10 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. 
विलगीकरणानंतर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी ब्रिस्टलला जातील. तर विलगीकरणात असताना पुरुषांच्या संघ साउथॅम्प्टनमध्ये सरावास परवानगी असेल. सध्या महिला आणि पुरुषांचे संघ मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात आहेत. 

संबंधित बातम्या