जरा हटके! न्यूझीलंडची अनोखी युक्ती, कुटुबियांनी केली World Cup 2023 साठी संघाची घोषणा

New Zealand Squad for World Cup 2023: न्यूझीलंड संघाची भारतात होणाऱ्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी घोषणा झाली असून केन विलियम्सन नेतृत्व करणार आहे.
New Zealand Team
New Zealand TeamDainik Gomantak

New Zealand Squad for World Cup 2023:

भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार असून आता या स्पर्धेसाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहेत. अशा संघांच्या घोषणाही केल्या जात आहेत. नुकतेच सोमवारी (11 सप्टेंबर) न्यूझीलंडनेही या वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे न्यूझीलंडने वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघातील खेळाडूंची ओळख करून देणारा एक खास व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संघात निवड झालेल्या खेळाडूंची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

यावेळी काही खेळाडूंच्या मुलांनी, तर काही खेळाडूंच्या पत्नीने, काही खेळाडूंच्या पालकांनी त्यांची ओळख करून दिली आहे. न्यूझीलंडच्या वर्ल्डकप संघाची घोषणा करण्याच्या या अनोख्या पद्धतीने अनेकांची मनं जिंकली आहेत.

New Zealand Team
भारतीय संघाची World Cup 2023 स्पर्धेसाठी घोषणा! रोहित कर्णधार, तर 'या' 15 खेळाडूंना संधी

दरम्यान, संघाबद्दल सांगायचे झाल्यास केन विलियम्सन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विलियम्सनला आयपीएल 2023 स्पर्धा खेळताना गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते.

मात्र दुखापतीतून विलियम्सन सावरत असून वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी आता सज्ज आहे. तो लवकरच वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंडकडून पुनरागमन करतानाही दिसेल.

दरम्यान, संघात वेगवान गोलंदाज टीम साऊथीही आहे. त्यामुळे विलियम्सन आणि साऊथी चौथा वर्ल्डकप खेळताना दिसणार आहेत.

याशिवाय संघात लेग स्पिनर इश सोधीचाही समावेश आहे. त्याचबरोबर रचिन रविंद्र आणि मार्क चॅपमन हे फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत. तसेच मिचेल सँटेनर हा अनुभवी फिरकीपटूही संघात आहे, तो खालच्या फळीत फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.

New Zealand Team
World Cup 2023: पंच अन् रेफ्रींची ICC ने केली घोषणा, जवागल श्रीनाथसह भारताच्या दोघांना संधी

तसेच टॉम लॅथम हा एकमेव यष्टीरक्षक संघात आहे. त्याचबरोबर ट्रेंट बोल्टही संघात खेळताना दिसणार आहे. नुकतेच त्याने संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय जिमी नीशम, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, डेवॉन कॉनवे असे अनुभवी खेळाडूही संघात आहेत.

न्यूझीलंड 2015 आणि 2019 असे सलग दोन वर्ल्डकपमध्ये उपविजेते राहिले आहेत. त्यामुळे यंदा विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा हेतू असेल. वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सलामीचा सामना त्यांना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध अहमदाबादला खेळायचा आहे.

असा आहे न्यूझीलंडचा संघ -

केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊथी, विल यंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com