या प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीची फुटबॉलविश्वात 'Queen Of WAGS' म्हणून ओळख

34 वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटूची (Cesc Fabregas) पत्नी डॅनिएला सीमन त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.
या प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीची फुटबॉलविश्वात 'Queen Of WAGS' म्हणून ओळख
Famous player Cesc Fabregas wife is known in football world as Queen Of WAGSInsta/ @daniellasemaan

34 वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटू सेस्क फॅब्रागासची (Cesc Fabregas) पत्नी डॅनिएला सीमन (daniella semaan) त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. दोघांनी 2018 साली लग्न केले. लोक फॅब्रेगासच्या पत्नी डॅनिएलाला 'WAGS ची राणी' देखील म्हणतात. 2011 मध्ये दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. लेबनॉनची रहिवासी, डॅनिएला सीमन आणि फॅब्रेगासची लंडनमधील जपानी रेस्टॉरंटमध्ये ओळख झाली तेव्हा डॅनिएला विवाहित होती.

स्टार फुटबॉलपटू फॅब्रेगासची पत्नी डॅनिएलाने यापूर्वी एली ताकटौकशी (Ellie Taktouk) लग्न केले होते. फॅब्रेगास आणि डॅनिएला भेटल्यानंतर दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केले. डॅनिएला 5 मुलांची आई आहे. त्यापैकी पहिले 2 मारिया आणि जोसेफ तिच्या पहिल्या पतीचे मुलं आहेत. फुटबॉल विश्वात डॅनिएलाच्या सौंदर्याचे वर्णन 'क्वीन ऑफ WAGS' असे केले जाते.

Famous player Cesc Fabregas wife is known in football world as Queen Of WAGS
Football India संघात गोव्याचे पाच जण

डॅनिएला सीमनला तिच्या पहिल्या लग्नापासून वेगळे होण्यासाठी कायद्याचा अवलंब करावा लागला. डेटिंग सुरू केल्यानंतर फुटबॉलपटू फॅब्रेगास आणि डॅनिएला यांनाही लग्नापर्यंत हा त्रास सहन करावा लागला. त्यानंतरच त्यांना कायदेशिररित्या लग्न करता आले.

Famous player Cesc Fabregas wife is known in football world as Queen Of WAGS
Football Premier League वर कोरोनाचे सावट

आर्सेनल, चेल्सी, बार्सिलोना आणि मोनॅकोसाठी खेळणारा सेस्क फॅब्रेगास जेव्हा डॅनिएलाला भेटला तेव्हा तो बार्सिलोनाकडून खेळत होता. त्यानंतर तो तीन वर्षांनी 2014 मध्ये लंडनच्या चेल्सी क्लबमध्ये परतला. फॅब्रेगास आणि डॅनिएला सीमन सतत त्यांच्या मुलांसोबत सुट्टी एंजॉय करताना दिसतात. 46 वर्षीय डॅनिएला सीमन इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर तीचे 4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com