चाहत्याने ऐन सामन्यादरम्यान घेतली विराट कोहलीकडे धाव; रिअ‍ॅक्शन बघून जावं लागलं परत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

अहमदाबादच्या जगतील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान एका चाहत्याने सर्व सुरक्षा तोडत  ग्राऊंडवर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीकडे धाव घेतली.

अहमदाबाद :  अहमदाबादच्या जगतील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान एका चाहत्याने सर्व सुरक्षा तोडत  ग्राऊंडवर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीकडे धाव घेतली. विराट कोहली रोहित शर्मासह फलंदाजी करीत असताना ही घटना तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या तिसर्‍या सत्रात घडली. विराट कोहलीला भेटण्यासाठी जेव्हा हा जबरा चाहता मैदानावर पोहोचला तेव्हा कोहलीने त्याला दूर राहण्यास सांगितले आणि या चाहत्याने कोहलीचे ऐकत तो पुन्हा स्टॅंडकडे गेला.

INDvsENG 3rd Day1 : अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ अडचणीत 

परंतु सुरक्षेस बाधा आणल्याच्या व कोरोनाच्या बायो बबलचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव पोलिसांनी या चाहत्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अक्षर पटेलच्या दमदार फिरकी गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांमध्ये गुंडाळला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाकडून रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 99 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा अजिंक्य रहाणेसह 57 धावांवर खेळत आहे. इंग्लंडने घेतलेला  प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या हिताचा ठरला. इंग्डलंडचा डाव १११२ धावांमध्ये गुंडाळल्यावनंतर  फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली.

निव्वळ योगायोग ! क्रिकेट स्टेडियमध्ये मोदी,अंबानी आणि अदानी आले एकत्र

गिलने 27 व्या चेंडूवर चौकारांसह आपले खाते उघडले. परंतु तो ११ धावच करू शकला. त्यानंतर आलेल्या पुजाराला जॅक लीचने खाते न उघडता तंबूत परत धाडले. पुजाराच्या बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माबरोबर 64 धावांची भागीदारी केली पण दिवसाचा खेळ संपायच्या आधी जॅक लीचच्या चेंडूवर शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

संबंधित बातम्या