फुटबॉल वर्ल्डकपच्या क्वालिफायर सामन्यात  चाहते अन् पोलिसांमध्ये वादावादी
हंगेरियन चाहते (Hungarian fans) वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) पोलिसांशी भिडले.Dainik Gomantak

फुटबॉल वर्ल्डकपच्या क्वालिफायर सामन्यात चाहते अन् पोलिसांमध्ये वादावादी

वर्णद्वेषी घटनेसाठी एका प्रेक्षकाला (fans) अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावरुन वाद हा सुरु झाला. पण पोलिसांनी (Police) हे प्रकरण योग्य रित्या हाताळल्याने पुढे कोणतीही घटना घडली नाही.

इंग्लंड (England) विरुद्ध मंगळवारी झालेल्या वर्ल्डकप (World Cup) क्वालिफायर फुटबॉल (Football) सामन्या दरम्यान हंगेरियन चाहते (Hungarian fans) वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) पोलिसांशी भिडले. सामन्याच्या प्रारंभी चाहते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी (Metropolitan Police) या घटनेबद्दल ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

हंगेरियन चाहते (Hungarian fans) वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) पोलिसांशी भिडले.
Goa: भारतीय फुटबॉल दर्जा चव्हाट्यावर

ते म्हणाले, जेव्हा त्यांनी वर्णद्वेषी घटनेसाठी एका प्रेक्षकाला अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावरुन वाद हा सुरु झाला. वेम्बली येथे सामना सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात, पोलीस अधिकारी वांशिक अपशब्द वापरणाऱ्या प्रेक्षकाला अटक करण्यासाठी स्टँडवर पोहोचले, तेव्हा इतर प्रेक्षकही या प्रकरणात सहभागी झाले त्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला.

हंगेरियन चाहते (Hungarian fans) वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) पोलिसांशी भिडले.
India Football: संभाव्य फुटबॉल संघात गोव्याचे सहा जण

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी एका निवेदनात म्हटले, वेम्बली येथे आज रात्री सामना सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात, अधिकारी कारभाऱ्यांबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे काही प्रेक्षकांना अटक करण्यासाठी स्टँडवर पोहोचले, पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेचा बडगा उगारल्यानंतर प्रेक्षकांनी लढा सुरू केला. पण पोलिसांनी हे प्रकरण योग्य रित्या हाताळल्याने पुढे कोणतीही घटना घडली नाही.

दरम्यान, फुटबॉल संघटनेने (एफए) याबाबत चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, आज रात्री वेम्बली स्टेडियमवर फिफा 2022 विश्वचषक पात्रता स्पर्धे दरम्यान घडलेल्या घटनेची आम्हाला माहिती आहे. आम्ही या घटनेची चौकशी करून FIFA ला अहवाल देऊ.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com