Team India: सॅमसन-सूर्यकुमारला बांगलादेशविरुद्ध संधी न दिल्याने BCCI वर टीकेची झोड, जातीवादाचाही आरोप

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली असून सॅमसन, सुर्यकुमारला संधी देण्यात आलेली नाही.
Suryakumar Yadav
Suryakumar Yadav Dainik Gomantak

Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यात 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याबरोबरच भारतीय अ संघही बांगलादेश दौऱ्यावर जाणार असून 2 चार दिवसीय सामने खेळणार आहे.

त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) वनडे मालिकेसाठी आणि चारदिवसीय मालिकेसाठी अनुक्रमे भारतीय राष्ट्रीय संघ आणि भारतीय अ संघाची निवड केली आहे. वनडे मालिकेसाठी रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन अशा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र, या दोन्ही संघात संजू सॅमसन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंना संधी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या भारतीय संघाच्या निवड समीतीवर टीकेची झोड उठली आहे.

Suryakumar Yadav
Team India: रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 कर्णधारपद का सोडावे? ही 3 सर्वात मोठी कारणे

खरंतर हे तिन्ही क्रिकेटपटू गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या लयीत आहेत. असे असतानाही त्यांना भारतीय संघात (Team India) संधी न दिली गेल्याने सोशल मीडिया युझर्सने बीसीसीआयवर टीका करताना जातीय भेदभाव केल्याचाही आरोप केला आहे.

भारतीय संघाला 4 डिसेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका बांगलादेशविरुद्ध खेळायची आहे. तसेच 14 ते 26 डिसेंबर दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यादरम्यानच भारतीय अ संघ 29 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान 2 चारदिवसीय सामने खेळणार आहे.

Suryakumar Yadav
Team India मध्ये संधी मिळालेल्या पाटीदारची कामगिरी राहिलीये धमाकेदार, पाहा आकडेवारी

बांगलादेशविरुद्ध भारताचा वनडे संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन

पहिल्या चारदिवसीय सामन्यासाठी भारतीय अ संघ -

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुन्नम्मल, यशस्वी जयस्वाल, यश धुल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित शेठ

दुसऱ्या चारदिवसीय सामन्यासाठी भारतीय अ संघ -

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुन्नम्मल, यशस्वी जयस्वाल, यश धुल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित शेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, केएस भरत (यष्टीरक्षक)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com