CWG मध्ये भीषण अपघात! भारतीय सायकलपटू विश्वजीत थोडक्यात बचावला, VIDEO

बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ 2022 या स्पर्धेमध्ये जगातील 72 देशांतील खेळाडू आपली ताकद दाखवत आहेत.
Commonwealth Games Accident
Commonwealth Games AccidentDainik Gomantak

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ 2022 चे आयोजन केले आहे, ज्यामध्ये जगातील 72 देशांतील खेळाडू आपली ताकद दाखवत आहेत. खेळाडूंना चिअर करण्यासाठी चाहतेही मोठ्या संख्येने स्टेडियमकडे वळत आहेत. या आनंदाच्या क्षणांमध्येच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भीषण अपघात पाहायला मिळाला. पुरुषांच्या 15 किमी स्क्रॅच सायकलिंग स्पर्धेदरम्यान हा अपघात झाला.

खेळाडू गंभीर जखमी

इंग्लंडचा सायकलपटू मॅट वॉल्स आणि कॅनडाचा डेरेक जी हे सायकलिंग ट्रॅक सोडून प्रेक्षक क्षेत्रात शिरले आणि त्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर 24 वर्षीय वॉल्स गंभीर जखमी झाला. आयल ऑफ मॅन सायकलपटू मॅथ्यू बोस्टॉकचाही या घटनेत सहभाग होता. वॉल्स, डेरेक गी आणि बोस्टॉक या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Commonwealth Games Accident
CWG 2022: अचिंता शेउलीने जिंकले वेटलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण'; भारताच्या खात्यात सहावे पदक

सायकलस्वार रूग्णालयात दाखल

या भीषण अपघाताने प्रेक्षकांना हादरवून सोडले. ली व्हॅली वेलोपार्क येथे ट्रॅक आणि पॅरा-ट्रॅक सायकलिंगच्या सकाळच्या सत्रात झालेल्या अपघातानंतर मैदानावरील वैद्यकीय पथकाने तीन सायकलस्वार आणि दोन प्रेक्षकांवर उपचार केले. या तिन्ही सायकलस्वारांना रुग्णालयात नेण्यात आले. तत्पर मदतीसाठी वैद्यकीय पथकाचे आभार मानतो, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

नंतर रुग्णालयातून सोडण्यात आले

ब्रिटनमधील सायकलिंगच्या प्रशासकीय मंडळाने ट्विट केले की, 'मॅट सुखरूप आहे आणि बोलत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मात्र, मॅट वॉल्सला नंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुसरीकडे टीम इंग्लंडने दावा केला आहे की ऑलिम्पिक चॅम्पियनच्या कपाळावर ओरखडे आणि जखमा झाल्या आहेत, त्यामुळे त्याला टाके पडले आहेत, परंतु कोणतीही मोठी दुखापत नाही, अशी माहिती मिळाली आहे.

भारतीय सायकलपटू विश्वजीत सिंगने पुरुषांच्या 15 किमी स्क्रॅच शर्यतीत चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. शर्यतीदरम्यान मोठ्या अपघातात विश्वजीत थोडक्यात बचावला. इंग्लंडचा मॅट वेल्स हा या अपघाताचा बळी ठरला असून तो गंभीर जखमी झाला आहे. या अपघातावर विश्वजीत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Commonwealth Games Accident
CWG 2022: जेरेमी लालरिनुंगाने भारतासाठी जिंकले दुसरे सुवर्ण, वयाच्या 19 व्या वर्षी मोठा विक्रम

विश्वजीत 10-लॅप पात्रता स्क्रॅच शर्यतीच्या अंतिम टप्प्यात धावत होता. यावेळी अनेक सायकलस्वार शर्यतीत सहभागी झाले होते. यादरम्यान अचानक अपघाताचे भयानक दृश्य दिसले. एका मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडचा मॅट वेल्स गंभीर जखमी झाला असून या अपघातात एकूण 8 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. या अपघातादरम्यान विश्वजीत अगदी जवळ पोहोचणार होता, तेव्हाच त्याने जोरात ब्रेक लावला आणि तो बचावला. याबद्दल विश्वजीतच्या प्रशिक्षकाने त्याचे कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com