आयएसएल बंगळूर अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत ; आज चेन्नईयीन एफसी विरूद्ध मिळणार संधी

गोमन्तक वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

माजी विजेत्या बंगळूर एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या सातव्या मोसमात अजून सूर गवसलेला नाही. दोन लढतीनंतरही ते विजयाच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना आज चेन्नईयीन एफसीकडून खडतर आव्हान अपेक्षित आहे.

पणजी  :  माजी विजेत्या बंगळूर एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या सातव्या मोसमात अजून सूर गवसलेला नाही. दोन लढतीनंतरही ते विजयाच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना आज चेन्नईयीन एफसीकडून खडतर आव्हान अपेक्षित आहे.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. चेन्नईयीनच्या खाती चार, तर बंगळूरचे दोन गुण आहेत. दोन्ही संघांचा उद्या तिसरा सामना आहे. बंगळूरचा सध्याचा फॉर्म पाहता, चेन्नईयीन स्पर्धेतील दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. 

बंगळूरविरुद्धचा सामना खास आहे, आमच्यासाठी ती डर्बीच असेल. जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तीन गुण मिळाल्यास गुणतक्त्यात आम्हाला स्थिरता लाभेल, असे सामन्याच्या पूर्वसंध्येला चेन्नईयीनचे प्रशिक्षक साबा लाझ्लो यांनी सांगितले. आक्रमणातील अपयशामुळे बंगळूर एफसीचे प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांचे नियोजन कोलमडले आहे. सुनील छेत्री, क्लेटन सिल्वा आणि क्रिस्तियन ओपसेथ या प्रमख आघाडीपटूंना अजूनही सूर गवसलेला नाही, मात्र कुआद्रात आशावादी आहेत. संघाच्या बचावात्मक पद्धतीनुसार संघ खूप सातत्य दाखवत आहे. मागील दोन्ही लढतीत आम्ही अन्य संघाचे आक्रमण चांगल्या पद्धतीने रोखले,  असे कुआद्रात यांनी नमूद केले.
 

दृष्टिक्षेपात...

  •   चेन्नईयीन एफसीची कामगिरी : २ सामने, १ विजय, १ बरोबरी, २          गोल केले, १ गोल स्वीकारला, ४ गुण
  •   बंगळूर एफसीची कामगिरी : २ सामने, २ बरोबरी, २ गोल केले, २         गोल स्वीकारले, २ गुण
  •   चेन्नईयीन मागील २ लढतीत : वि. वि. जमशेदपूर २-१, बरोबरी वि.         केरळा ब्लास्टर्स ०-०
  •   बंगळूर मागील २ लढतीत : बरोबरी वि. एफसी गोवा २-२, बरोबरी          वि. हैदराबाद ०-०
  •   गतमोसमात : बंगळूर येथे बंगळूर एफसी ३-० विजयी, चेन्नई येथे         ०-० बरोबरी

 

अधिक वाचा :

एटीके मोहन बागानचा इंज्युरी टाईमच्या शेवटच्या मिनिटास गोल; ओडिशाची एका गोलने हार 

संबंधित बातम्या