Goa Professional Football League: जीनो क्लबची सलग दुसरी बरोबरी; अखेरच्या मिनिटातील गोलमुळे एफसी गोवास गुण

सोमवारी स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यात लढत होईल
Geno FC Player Abelson Jachi
Geno FC Player Abelson JachiDainik Gomantak

FC Goa And Geno FC Drew Match: जीनो फुटबॉल क्लबने प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील पदार्पणाच्या वर्षातील लक्षवेधक खेळाची मालिका कायम राखताना रविवारी आणखी एका माजी विजेत्यांना गोलबरोबरीत रोखले.

एफसी गोवा संघाने सामन्याच्या अखेरच्या मिनिटास केलेल्या गोलमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून घ्यावा लागला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर रविवारी झालेला सामना १-१ असा गोलबरोबरीत राहिला. सामन्यातील दोन्ही गोल अखेरच्या 15 मिनिटांतील खेळात झाले.

Geno FC Player Abelson Jachi
US Open: 19 वर्षीय कोको गॉफ नवी चॅम्पियन, फायनलमध्ये सबालेंका पराभूत

सामनावीर ठरलेल्या आबेलसन जाची याने ७५व्या मिनिटास जीनो क्लबसाठी गोल केल्यानंतर, कर्णधार लीवन कास्ताना याच्या गोलमुळे एफसी गोवा संघाने ९०व्या मिनिटास बरोबरी साधली.

जीनो क्लबने स्पर्धेतील पहिल्या सामन्यातही माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला १-१ असे बरोबरीत राखून गुण विभागून घेतला होता. त्यांचे आता दोन लढतीतून दोन गुण झाले आहेत.

एफसी गोवाचे आता तीन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. दुसऱ्या फेरीतील लढतीत त्यांनी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला एका गोलने नमविले होते, तर त्यापूर्वी त्यांना चर्चिल ब्रदर्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

Geno FC Player Abelson Jachi
Lagori Championship: गोव्याच्या पुरुष लगोरी संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, तर महिलांना ब्राँझपदक

सामन्यातील पंधरा मिनिटे बाकी असताना जीनो क्लबच्या आर्यन चौहान याने चांगली चाल रचली. त्याने प्रजय नाईक याला चेंडू पास केला. प्रजयने एफसी गोवाच्या बचावपटूंना चकवा देत ताकदवान फटका मारला.

गोलरक्षक मिकी डायसने फटका रोखला, पण तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही. ती संधी साधत आबेलसन याने रिबाऊंड फटक्यावर जीनो क्लबला आघाडी मिळवून दिली.

समोर पराभव उभा ठाकलेला असताना बदली खेळाडू आकाश ओराव याच्या असिस्टवर लीवन कास्ताना याने एफसी गोवासाठी बरोबरीचा गोल केला.

स्पर्धेत सोमवारी (ता. ११) म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यात लढत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com