एफसी गोवाने केली 26 सदस्यीय डेव्हलपमेंट संघाची घोषणा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

आगामी गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेसाठी एफसी गोवाने 26 सदस्यीय डेव्हलपमेंटल संघाची घोषणा केली आहे, त्यात 18 वर्षांखालील संघातील आठ खेळाडूंचा समावेश आहे.

पणजी: आगामी गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेसाठी एफसी गोवाने 26 सदस्यीय डेव्हलपमेंटल संघाची घोषणा केली आहे, त्यात 18 वर्षांखालील संघातील आठ खेळाडूंचा समावेश आहे.

युवा प्रशिक्षक डेजी कार्दोझ यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून संघ सराव करत आहे, तसेच काही सराव सामनेही खेळला आहे. त्यात सेझा फुटबॉल अकादमीवर त्यांनी 3-1 फरकाने विजय साकारला. प्रो-लीग स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे.

डेव्हलपमेंटल संघात ह्रतिक तिवारी, दिशांक कुंकळीकर, रायन रॉजर मिनेझिस, व्हेलरॉय फर्नांडिस, म्यूटॉन फर्नांडिस, ब्रायसन फर्नांडिस, वासीम इनामदार व जॉयबर्ट आल्मेदा या १८ वर्षांखालील संघातील खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू गतमोसमात एलिट लीग स्पर्धेच्या गोवा विभागीय स्पर्धेत एफसी गोवा संघातून खेळले होते. गतमोसमात स्पोर्टिंग क्लब द गोवाकडून खेळलेला डेल्टन कुलासो व मुंबईतील एअर इंडिया संघाचा रॉलेन फर्नांडिस हे एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघातील नवे खेळाडू आहेत.

संघ असा : गोलरक्षक : ह्रतिक तिवारी, अंतोनियो डायलन डिसिल्वा, हॅन्सेल कुएल्हो, विद्देश भोसले, बचावपटू : दिशांत कुंकळीकर, लालमांगैसांगा, माल्सॉम्त्लुआंगा राल्टे, रायन रॉजर मिनेझिस, ब्रायन फारिया, सेरिनियो फर्नांडिस, रॉलेन फर्नांडिस, लेस्ली रिबेलो, अलिस्टर फर्नांडिस, मध्यरक्षक : व्हेलरॉय फर्नांडिस, फ्रान्सिस कुलासो, ब्रायसन फर्नांडिस, नेस्टर डायस, कपिल होबळे, ख्रिस्ती डेव्हिस, डेल्टन कुलासो, वासीम इनामदार, आयव्हॉन कॉस्ता, म्यूटॉन फर्नांडिस, एचपी लालरेमरुआता, आघाडीपटू : एरेन डिसिल्वा, जॉयबर्ट आल्मेदा.
 

संबंधित बातम्या