एफसी गोवाचा तीस सदस्यीय संघ जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

एफसी गोवाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी तीस सदस्यीय संघ जाहीर केला आहे. स्पेनचे ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील संघात सहा परदेशी खेळाडू आहेत.

पणजी : एफसी गोवाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी तीस सदस्यीय संघ जाहीर केला आहे. स्पेनचे ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील संघात सहा परदेशी खेळाडू आहेत. त्यापैकी पाच जण स्पेनचे, तर एक जण ऑस्ट्रेलियाचा आहे. बचावपटू जेम्स डोनाची याच्या निवडीने आशियाई फुटबॉल महासंघाच्या खेळाडूची पूर्तता झाली आहे. एफसी गोवाच्या तीस सदस्यीय संघातील १४ जण गोव्यातील आहेत. गतमोसमातील ११ जणांना संघाने कायम राखले आहे. 

एफसी गोवा संघ
गोलरक्षक : महम्मद नवाझ, नवीन कुमार, शुभम धस, डायलन डिसिल्वा, बचावपटू : सॅनसन परेरा, सेरिटन फर्नांडिस, लिअँडर डिकुन्हा, इव्हान गोन्झालेझ (स्पेन), महमद अली, जेम्स डोनाची (ऑस्ट्रेलिया), सेरिनियो फर्नांडिस, अईबांभा डोहलिंग, सेवियर गामा. मध्यरक्षक : लेनी रॉड्रिग्ज, नेस्टर डायस, एदू बेदिया (स्पेन), प्रिन्सटन रिबेलो, अल्बर्टो नोगेरा (स्पेन), ब्रँडन फर्नांडिस, फ्रांग्की बुआम, रेडीम ट्लांग, माकन विंकल चोथे, अलेक्झांडर रोमारियो जेसूराज, जॉर्ज ऑर्टिझ (स्पेन), फ्लॅन गोम्स, सेईमिन्लेन डौंगेल, आघाडीपटू : इगोर आंगुलो (स्पेन), ॲरेन डिसिल्वा, देवेंद्र मुरगावकर, ईशान पंडिता

संबंधित बातम्या