एफसी गोवाची अंतिम फेरीत धडक

पेनल्टी फटका रोखणारा गोलरक्षक नवीन विजयाचा शिल्पकार, बंगळूरला नमविले
एफसी गोवाची अंतिम फेरीत धडक
FC Goa beat in finalDainik Gomantak

पणजी: एफसी गोवाचा (FC Goa) गोलरक्षक नवीन कुमार याच्यासाठी 130व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेचा (Durand Cup football tournament) उपांत्य सामना बुधवारी संमिश्र ठरला. निर्धारित वेळेत दोन वेळा त्याची एकाग्रता ढळली. त्याचा लाभ उठवत बंगळूर एफसी गोल केले. सामना अतिरिक्त वेळेतही 2-2 असा गोलबरोबरीत राहिल्यानंतर नवीनने पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन वेळा चेंडूचा अचूक अंदाज बांधला. त्यामुळे सडन-डेथमध्ये 6-7 फरकाने विजय नोंदवत गोव्यातील संघाने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला.

FC Goa beat in final
विनू मांकड करंडक Under-19 क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा पहिला विजय

सामना बुधवारी कोलकाता येथील विवेकानंद युबा भारती क्रीडांगणावर झाला. स्पर्धेचा अंतिम सामना तीन ऑक्टोबरला होईल. त्यावेळी एफसी गोवासमोर कोलकात्यातील मोहम्मेडन स्पोर्टिंगचे आव्हान असेल. मोहम्मेडन स्पोर्टिंगने अगोदरच्या उपांत्य लढतीत बंगळूर युनायटेडवर 4-2 फरकाने मात केली होती.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटास शिव शक्ती याने बंगळूरला आघाडी मिळवून दिली, मात्र त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. देवेंद्र मुरगावकर याने स्पर्धेतील वैयक्तिक पाचवा गोल नोंदवत एफसी गोवास बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात देवेंद्रला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, त्यामुळे एफसी गोवाच्या आक्रमणावर मर्यादा आल्या. नंतर 72व्या मिनिटास बदली खेळाडू रेडीम ट्लांग याच्या गोलमुळे हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्यातील संघाने सामन्यात आघाडी मिळविली. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना शिव शक्ती याच्या हेडरचा अंदाज गोलरक्षक नवीनला आला नाही व बंगळूरने 2-2 अशी गोलबरोबरी साधली. अतिरिक्त वेळेतील काही मिनिटे बाकी असताना एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया सोपी संधी असताना गडबडला आणि निकालासाठी पेनल्टी शूटआऊटची गरज भासली.

FC Goa beat in final
Badminton स्पर्धेत एनी लोबो हिला तिहेरी मुकुट

टायब्रेकरमध्ये निर्धारित पाचपैकी चार फटक्यांवर दोन्ही संघांनी गोल केले. एफसी गोवाचा गोलरक्षक नवीन कुमारने आकाशदीपचा फटका अडविला, तर बंगळूरचा गोलरक्षक लारा शर्मा याने रेडीम ट्लांगचा फटका रोखला. सडन-डेथमध्ये 6-6 अशी बरोबरी असताना एफसी गोवाच्या डेव्हिस ख्रिस्ती याने अचूक नेम साधला. बंगळूरचा युवा खेळाडू दामैतफांग लिंगडोह याने मारलेला फटका नवीन कुमारने रोखत एफसी गोवास अंतिम फेरीत नेले. विजयी संघाचा कर्णधार एदू बेदिया सामन्याचा मानकरी ठरला.

Related Stories

No stories found.