ISL FC Goa vs Kerala Blasters : एफसी गोव्याची केरळवर मात

3-1 फरकाच्या विजयासह पाचव्या स्थानी झेप
FC Goa vs Kerala Blasters
FC Goa vs Kerala BlastersDainik Gomantak

ISL FC Goa vs Kerala Blasters : एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीचा दावा कायम राखताना रविवारी प्रेक्षणीय विजय नोंदविला. मागील चार सामन्यांतून फक्त दोन गुणांची कमाई केल्यानंतर त्यांनी उल्लेखनीय खेळ करत केरळा ब्लास्टर्सला 3-1 फरकाने हरविले आणि गुणतक्त्यात पाचवे स्थान प्राप्त केले.

FC Goa vs Kerala Blasters
IND vs NZ Hockey World Cup 2023 : भारताचं स्वप्न भंगलं, क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मोसमात एफसी गोवाने जिंकलेला हा पाचवा सामना ठरला. विश्रांतीला ते 2-0 फरकाने आघाडीवर होते. स्पॅनिश इकेर ग्वोर्रोचेना याने 35व्या मिनिटास पेनल्टीवर अचूक नेम साधला. नंतर नोआ सदावी याने 43व्या मिनिटास आघाडी बळकट केली.

बदली खेळाडू रेडीम ट्लांग याने 69व्या मिनिटास एफसी गोवाची आघाडी आणखी मजबूत केली. त्यापूर्वी ग्रीक खेळाडू दिमित्रिओस दियामान्ताकोस 51व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सची पिछाडी एका गोलने कमी केली होती.

FC Goa vs Kerala Blasters
Air India Sale: प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर एअर इंडियाची धमाकेदार ऑफर, तिकीटात बंपर सूट!

महिनाभरानंतर विजय

एफसी गोवा संघाने आयएसएलमधील शेवटचा सामना 17 डिसेंबरला फातोर्डा येथेच नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध जिंकला होता. त्यानंतर स्पर्धेतील एकंदरीत सातवा सामना जिंकताना त्यांनी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्यांचे आता 15 लढतीतून 23 गुण झाले असून ओडिशा एफसीला एका गुणाने मागे टाकत सहाव्या स्थानी लोटले.

केरळा ब्लास्टर्सचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत पाचवा पराभव ठरला. त्यामुळे 14 लढतीनंतर त्यांचे 25 गुण व तिसरा क्रमांक कायम राहिला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कोची येथे केरळा ब्लास्टर्सने 3-1 फरकाने विजय नोंदविला होता. त्याचा वचपा रविवारी एफसी गोवाने काढला. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना फातोर्डा येथेच गुरुवारी (ता. 26) ईस्ट बंगालविरुद्ध होईल.

FC Goa vs Kerala Blasters
U-25 CK Nayudu Trophy: छत्तीसगडच्या आशिषने गोव्याला गुंडाळले; टिपले 7 गडी

यजमान संघाचा सफाईदार खेळ

एफसी गोवाने नॉर्थईस्टविरुद्ध मागील बरोबरीच्या सामन्यात केलेल्या निराशाजनक खेळाची पुनरावृत्ती टाळली व केरळा ब्लास्टर्स संघ धोकादायक ठरणार नाही याची दक्षता घेतली. यजमान संघाचा भर आक्रमणावर जास्त होता.

अशाच एका प्रयत्नात एफसी गोवाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडिस याला गोलक्षेत्रात सौरव मंडल याने पाडले, यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर ग्वोर्रोचेना याने गोलरक्षक प्रभसुखन गिल याला सहज चकविले.

विश्रांतीला दोन मिनिटे असताना केरळा ब्लास्टर्सच्या सोराईशाम संदीप सिंग याचे हेडिंग चुकले आणि एफसी गोवाच्या सदावी याने संधी साधली. केरळा ब्लास्टर्सने पिछाडी कमी केल्यानंतर ब्रेंडनच्या अप्रतिम असिस्टवर बदली खेळाडू ट्लांग याचा सणसणीत फटका रोखणे गोलरक्षक प्रभसुखनला जमले नाही.

दृष्टिक्षेपात...

  1. आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 10 विजय

  2. यंदा एफसी गोवाच्या इकेर ग्वोर्रोचेना याचे 7, नोआ सदावी याचे 6, तर रेडीम ट्लांग याचे 3 गोल

  3. केरळा ब्लास्टर्सच्या दिमित्रिओस दियामान्ताकोस याचे एकूण 7 गोल

  4. फातोर्ड्यात घरच्या मैदानावर यंदा एफसी गोवाचे 7 सामने, 5 विजय, 2 पराभव

  5. एफसी गोवाचे यावेळच्या स्पर्धेत आता 26, तर केरळा ब्लास्टर्सचे 23 गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com