स्पॅनिश गुणवत्तेवर एफसी गोवाचा विश्वास

किशोर पेटकर
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

नव्या मोसमात आंगुलो मागील तीन मोसमात यशस्वी ठरलेला फेरान कोरोमिनास याचीतर ऑर्टिझला ह्यूगो बुमूस याची जागा  मिळण्याचे निश्चित मानले जाते.

पणजी

 आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाने स्पॅनिश गुणवत्तेवर विश्वास दाखविला आहे. आतापर्यंत करारबद्ध केलेल्या परदेशी खेळाडूंत सारे स्पेनचेच आहेत. त्यांचा नवा बचावपटू इव्हान गार्रीडो गोन्झालेझ हा सुद्धा त्याच देशातील आहे.

एफसी गोवा संघ २०२०-२१ मोसमासाठी नव्याने संघ बांधणी करत आहे. नव्या परदेशी खेळाडूंत त्यांनी इगोर आंगुलो याला आघाडीफळीततर जॉर्ज ऑर्टिझ मेंडोझा याला मध्यफळीत खेळविण्यासाठी संघात घेतले आहे. याशिवाय त्यांनीअनुभवी स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याचा करारही दोन वर्षांसाठी वाढविला आहे.

एफसी गोवाने प्रशिक्षकपदी स्पेनचेच ह्वआन फेरॅन्डो यांना नियुक्त केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेता संघ आयएसएलतसेच एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळेल. नव्या मोसमात आंगुलो मागील तीन मोसमात यशस्वी ठरलेला फेरान कोरोमिनास याचीतर ऑर्टिझला ह्यूगो बुमूस याची जागा  मिळण्याचे निश्चित मानले जाते.

 

इव्हान गोन्झालेझ नवा खेळाडू

प्राप्त वृत्तानुसारएफसी गोवा संघ लवकरच बचावफळीत आणखी एक नवा स्पॅनिश बचावपटू नव्या मोसमात खेळेल. सेंटर-बॅक खेळाडू तीस वर्षीय इव्हान गार्रीडो गोन्झालेझ याने एफसी गोवाचा करार दोन वर्षांसाठी मान्य केला आहे. गोन्झालेझ हा रेयाल माद्रिदच्या युवा संघात तयार झालेला आहे. २००२ साली वयाच्या १२व्या वर्षी तो रेयाल माद्रिदच्या युवा संघात दाखल झाला. देपोर्तिव्हो बकॉन्केन्स या संघातून खेळल्यानंतर २०१४ मध्ये त्याने कल्चरल लिओनेसा संघाशी करार केलानंतर २०१५ मध्ये तो रेसिंग फेर्रोल संघाकडून खेळला२०१६ पासून त्याने पुन्हा तृतीय श्रेणीतील लिओनेसा संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाकडून चार मोसमात माद्रिदस्थित खेळाडू १६७ सामने खेळला आहे. एफसी गोवाचे सध्याचे प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली गोन्झालेझने लिओनेसा संघाचे २०१५-१६ मोसमात प्रतिनिधित्व केले असून ऑर्टिझ याच्या समवेत या संघातून २०१८-१९ मोसमात खेळला होता. ऑर्टिझ आता गोन्झालेझचा एफसी गोवा संघातही सहकारी असेल.

एफसी गोवाचा हुकमी बचावपटू कार्लोस पेना याने निवृत्ती जाहीर केली आहेतर मुर्तदा फॉल मुंबई सिटी एफसीकडून खेळण्याची माहिती आहे. दोघा प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत एफसी गोवाचे बचाव कमकुवत होण्याचा संभव आहेमात्र नव्या स्पॅनिश खेळाडूमुळे त्यांच्या बचावफळीत बळकटी येण्याचे मानले जाते.

गोन्झालेझ मागील मोसमात कल्चरल लिओनेसा संघाचा कर्णधार होता. मात्र संघाला स्पेनमधील द्वितीय विभागीय स्पर्धेस पात्र ठरण्यास अपयश आल्यानंतर गार्रीडो याने एफसी गोवाच्या करारास प्राधान्य दिले. तो संघ सोडत असल्याचे कल्चरल लिओनेसा संघाने जाहीर केले आहे. या संघासोबत त्याचा आणखी एका वर्षाचा करार बाकी होता. मागील पाच मोसमात तो नियमितपणे मैदानावर खेळला.

संपादन - तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या