एफसी गोवाचे प्रशिक्षक फेरांडो कोविड बाधित

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

एफसी गोवा क्लब बाधित ठरलेल्या फेरांडो यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे, आणि त्यांना सर्व आवश्यक सहकार्य केले जाईल.

पणजी: (FC Goa coach Ferrando Covid disrupted) एफसी गोवा फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो कोविड-१९ बाधित ठरले असून ते आता स्वयंविलगीकरणात आहेत. त्यांचे प्रकृती उत्तम  असून आजाराची लक्षणे नाहीत, असे क्लबने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

एफसी गोवा क्लबतर्फे खेळाडू, स्टाफची नियमितपणे कोविड-१९ चाचणी केली जाते, तसेच आरोग्यसुरक्षाविषयक सर्व शिष्टाचाराची अंमलबजावणी केली जाते. एफसी गोवा क्लब बाधित ठरलेल्या फेरांडो यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्यांना सर्व आवश्यक सहकार्य केले जाईल. एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कोरोना बाधित ठरले, तरी बाकी सर्व संघ सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आहे. गेल्या काही दिवसांत फेरांडो यांच्या संपर्कात आलेल्या साऱ्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी आणि आवश्यक आरोग्यसुरक्षका उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन एफसी गोवातर्फे करण्यात आले आहे.(FC Goa coach Ferrando Covid disrupted)

गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगुटला सेझा अकादमीने रोखले

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा संपल्यानंतर फेरांडो व एफसी गोवा संघातील अन्य खेळाडू आगामी आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेसाठी गोव्यातच सराव करत आहेत. आशियाई चँपियन्स लीग स्पर्धा 14 ते 30 एप्रिल या कालावधीत गोव्यात खेळली जाईल. गट ईमध्ये एफसी गोवासह इराणचा पर्सेपोलिस, कतारचा अल रय्यान व प्ले-ऑफ फेरीतील पात्र संघाचा समावेश आहे. हल्लीच संपलेल्या आयएलएस स्पर्धेत फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने चौथा क्रमांक मिळविला होता.

संबंधित बातम्या